Emergency Helpline For Govinda's: दहीहंडीतील जखमी गोविंदांसाठी हेल्पलाइन जारी, 'या' क्रमांकांवर साधा संपर्क

Emergency Helpline Dahi Handi: देशभरात आज मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी केली जात आहे. विशेष म्हणजे मुंबई आणि परिसरात दरवर्षी दहीहंडी धुमधडाक्यात साजरी केली जाते.
Mumbai Helpline For Injured dahi handi govindas
Mumbai Helpline For Injured dahi handi govindasEsakal
Updated on

Helpline for injured Govinda's: देशभरात आज मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी केली जात आहे. विशेष म्हणजे मुंबई आणि परिसरात दरवर्षी दहीहंडी धुमधडाक्यात साजरी केली जाते. इथे गोविंद पथके मोठमोठे थर लावत विश्वविक्रमही रचतात. अशात या उत्सवादरम्यान गोविंदा मोठ्या प्रमाणात जखमी होतात. यापूर्वी थरावरुन खाली पडल्याने काही गोविंदांना अपगंत्व तर काहींचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

ही परिस्थिती लक्षात घेत डोंबिवलीतील एम्स रुग्णालयाने जखमी गोविंदांसाठी इमर्जेंसी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.

इथे साधा संपर्क

यासाठी कोणत्याही गोविंदाला ऑर्थोपेडिक किंवा मेंदूला दुखापत झाल्यास तात्काळ वैद्यकीय मदत आणि रुग्णवाहिका सेवांसाठी आपत्कालीन हेल्पलाइन नंबर 7506274959 वर कॉल करण्याचे आवाहन एम्सने केले आहे.

दहीहंडी उत्सवात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील गोविंदां सहभागी होतात. या दरम्यान अनपेक्षितपणे थरुवारून खाली पडल्याने आणि चेंगराचेगरीमुळे गोविंदांना मेंदूच्या दुखापती (TBIs) होतात. यामुळे ते कोमात जाण्याची शक्यता, अर्धांगवायू, फेफरे, रक्तवाहिन्यांचे नुकसान, चक्कर येणे आणि स्मृती जाणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

Mumbai Helpline For Injured dahi handi govindas
Who is Jayeep Apte: पुतळा कोसळल्यावर काय म्हणाला शिल्पकार जयदीप आपटे? उभारणीचं काम त्याला कोणी दिलं होतं?

मुंबई आणि परिसरात दहीहंडीला दणक्यात सुरूवात

मुंबई आणि ठाणे परिसरात प्रसिद्ध असलेल्या दहीहंड्यांना काहीवेळापूर्वी सुरुवात झाली असून, मुंबईकरांमध्ये याबाबत मोठा उत्साह दिसून येत आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आज मुंबई परिसरातील विविध दहीहंड्यांना उपस्थित राहणार आहेत. तर भाजपने ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात कमळ दहीहंडीचे आयोजन केले आहे.

दरम्यान भांडुपमध्ये मनसेने आयोजित केलेल्या दहीहंडीत जय जवान पथकाने नऊ थरांची सलामी दिली आहे. मनसेचे मोहन चिरात यांनी या दहीहंडीचे आयोजन केले आहे.

Mumbai Helpline For Injured dahi handi govindas
Mumbai: पार्टीत प्रचंड दारू आणि कॉकटेल प्यायला अन्.. ; टाटा इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक माहिती समोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.