India Mumbai Meeting: मुंबईत 'इंडिया' नेत्यांच्या डिनरमध्ये पुरणपोळी, झुणका-भाकर, वडापाव; लोगोही होणार लाँच

India Alliance
India AllianceEsakal
Updated on

Mumbai India Alliance Meeting

मुंबई- इंडिया आघाडीची बैठक मुंबईमध्ये ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला होणार आहे. यापार्श्वभूमीवर देशभरातील नेते बैठकीसाठी मुंबईत येणार आहेत. त्यामुळे बैठकीच्या दृष्टीने जय्यत तयार करण्यात येत आहे. मुंबईत होणाऱ्या बैठकीत इंडिया आघाडीचा लोगो लाँच केला जाणार आहे. तसेच ३१ ऑगस्टला होणाऱ्या बैठकीसाठी नेत्यांचा डिनरसाठीचा मेन्यूही ठरला आहे.

'इंडिया' नेत्यांच्या डिनरमध्ये पुरणपोळी, झुणका-भाकर, वडापाव असे महाराष्ट्रीयन पदार्थ असणार आहेत. विशेष म्हणजे याच बैठकीतून इंडिया आघाडी आपला लोगो लाँच करेल. माहितीनुसार, आघाडीचा नवा लोगो इंडियाच्या नावाप्रमाणे असेल. भारताच्या तिरंग्या प्रमाणे तीन रंगात हा लोगो असणार आहे. त्यामुळे इंडिया आघाडीच्या लोगोबाबत उत्सुकता आहे.

India Alliance
INDIA Mumbai Meeting: केजरीवाल 'इंडिया'च्या मुंबईतल्या बैठकीला लावणार हजेरी; स्वतःचं सांगितली रणनिती

आघाडीच्या समन्वयकाच्या नावाची घोषणा मुंबईच्या बैठकीत होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येतंय. या बैठकीत 11 सदस्यांच्या समितीचे नाव जाहीर करण्याची शक्यता आहे. देशभरातील नेते बैठकीसाठी येणार असल्याने जागावाटपावरूनही इंडिया आघाडीतील बड्या नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र आदी राज्यात आघाडीची चर्चा होऊ शकते, असं सांगितलं जातंय.

India Alliance
Nitin Gadkari : इंडिया आघाडीतील पक्षाकडून गडकरींना पंतप्रधान पदाची ऑफर; ''कॅगच्या रिपोर्टनंतर...''

मुंबईत विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. इंडिया आघाडीत २६ राजकीय पक्ष सामील आहेत. त्यामुळे विरोधकांची आघाडी बळकट होताना दिसत आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीचे यजमानपद उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. मुंबईतील बैठकीची तयारी जोरात सुरू आहे. आतापर्यंत २७ पक्षांच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रणे गेल्याचं सांगण्यात आलंय.

India Alliance
India Alliance : दबावामुळे कोणताही पक्ष 'इंडिया'तून बाहेर पडणार नाही; ठाकरे गटाच्या नेत्याच विधान

पाच राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, ‘राजद’चे लालूप्रसाद यादव, संयुक्त जनता दलाचे नितीशकुमार, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला हे नेते या बैठकीला येतील. शरद पवार यांनाही निमंत्रण दिले आहे. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल हेही बैठकीला येणार असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.