मुंबईच्या पोटात नेमकं काय दडलंय? नागपूरच्या लेखकाचे चक्रावून सोडणारे पुराव्यांसह दावे

जेजे रूग्णालयात सापडलेल्या भुयाराबद्दलही लेखक प्रकाश कोयाडे यांनी आधीच लिहून ठेवलंय
Viral
ViralSakal
Updated on

मुंबई : मुंबईतील जे.जे. रूग्णालय परिसरात एक भुयार सापडल्याची माहिती समोर आलीये. हे भुयार 130 वर्षापूर्वीचं असल्याचं सांगण्यात येत असून रूग्णालयात असलेल्या डी. एम पेटीट इमारतीमध्ये हे भुयार आढळलंय. तर 'प्रतिपश्चंद्र' या कादंबरीचे लेखक प्रकाश कोयाडे यांनी जे.जे. रूग्णालयात भुयार असल्यासंदर्भात मी अगोदरच लिहून ठेवलं असल्याचा दावा केलाय. त्याचबरोबर मुंबईच्या पोटात असे अनेक भुयारं असल्याचा दावाही त्यांनी केलाय.

हेही वाचा - एका सुफी विचारवंताच्या नजरेतले हिंदुत्व

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जेजे रूग्णालय परिसरात भुयार सापडल्याची बातमी आली होती. त्यानंतर लेखक कोयाडे यांनी फेसबुक पोस्ट करत यासंदर्भात मी अगोदरच लिहिलं असल्याचा दावा केला. तर "ज्यादिवशी मी वर्णन केलेलं रायगडावरील भुयार जगासमोर येईल तो दिवस सोन्याचा असेल" असं लेखक कोयाडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्यांनी या फेसबुक पोस्टमध्ये त्यांच्या कादंबरीमध्ये असलेल्या उल्लेखाचे फोटोदेखील पोस्ट केले आहेत.

Viral
Aditya vs Fadnavis : कोण खरं कोण खोटं? तिन्ही प्रकल्पासंदर्भात दोघांनीही सादर केले पुरावे

काय आहे 'प्रतिपश्चंद्र'चे लेखक प्रकाश कोयाडे यांचा दावा?

"मी जवळपास ४ वर्षापूर्वी जेजे रूग्णालयाच्या परिसरात भुयार असल्याचं माझ्या पुस्तकात लिहिलं आहे. अजूनही तीन चार भुयारांचा या पुस्तकात मी उल्लेख केला आहे. त्याचबरोबर इंग्रजांच्या काळात बांधलेल्या जवळपास सर्वच इमारतींच्या खाली भुयारं आहेत पण ते समोर आले नाहीत. मुंबईमध्ये जवळपास १०० भुयारं सध्या असतील पण ते समोर आले नाहीत" असं कोयाडे म्हणालेत.

जे जे रूग्णालयात भुयार होतं यासंदर्भात तेथील कर्मचाऱ्यांना माहिती होतं

आपल्या जे जे रूग्णालयाच्या इमारतीखाली भुयार असल्याची माहिती होती पण हे भुयार नेमकं कुठं आहे यासंदर्भात माहिती त्यांना नव्हती. तर हे भुयार शोधण्याचा प्रयत्नही केला नाही. आत्ता या भुयाराचा शोध लागल्यानंतर मला अनेकांंनी फोन केले असा दावा कोयाडे यांनी केलाय.

पोस्ट ऑफिस आणि CSMTच्या इमारतीखाली भुयारं

सीएसएमटी स्टेशनच्या इमारतीखाली एक भुयार आहे. ते भुयार सीएसएमटी ते रिझर्व बँक असं कनेक्ट आहे. हे भुयार एवढं मोठं आहे की त्यामधून एक कार जाऊ शकते. त्याचबरोबर मुंबईतील पोस्ट ऑफिसच्या कार्यालयाखाली दीड ते दोन किलोमीटरचं भुयार आहे. ते भुयार मुंबईतील फोर्ट भागात निघते असाही दावा त्यांनी केलाय.

Viral
Elon Musk: ब्ल्यू टिकवाल्या मस्कने हिंदीत ट्विट केलंय पण फसू नका, इथं कार्यक्रम गंडलाय

मुंबई महापालिकेच्या इमारतीखालीही भुयार असण्याची शक्यता

इंग्राजांनी त्यांच्या काळात ज्या ज्या इमारती बांधल्या आहेत त्या सर्व इमारतीखाली भुयारं आहेत. संकटकाळात त्यांना लपण्यासाठी त्यांनी ही सोय केली असावी. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीखालीही भुयार असू शकते असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

राजभवनच्या इमारतीखाली भुयार असल्याचा दावा मी आधीच केला होता

राजभवनच्या खाली एक भुयार असल्याचा दावा मी आधीच केला होता. त्यानंतर ते भुयार २०१७ मध्ये सापडलं. तर त्यामध्ये काही तोफा पण आढळल्या होत्या. असा दावा 'प्रतिपश्चंद्र' या कादंबरीचे लेखक प्रकाश कोयाडे यांनी केलाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()