कोल्हापूर : टू जेट कंपनीच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे खंडित असलेली मुंबई ते कोल्हापूर विमान सेवा आजपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा आठवड्यातून आता सोमवार, बुधवार आणि शुक्रवार अशी तीन दिवस सुरू राहणार आहे. मुंबई-कोल्हापूर-मुंबई विमानसेवा (Mumbai-Kolhapur-Mumbai Airlines) दररोज सुरु करण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न असून फेब्रुवारीपर्यंत ही सेवा दररोज सुरु होईल अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी सोशल मीडियावरुन दिली आहे. शिवाय लवकरच कोल्हापूर-मुंबई मार्गावर कार्गो सेवा सुरू केली जाणार आहे. असे ही त्यांनी सांगितले.
आज कोल्हापूरातून मुंबईसाठी १३ प्रवाशी रवाना झाले.सततच्या खंडित होणाऱ्या विमान सेवेमुळे प्रवाशांचा थंडा प्रतिसाद मिळाल्याचे यावेळी पाहायला मिळाले. गेल्या अडीच महिन्यांपासून विमानसेवा ट्रू जेट कंपनीच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे बंद होती. किमान यापुढे विमानसेवा नियमित सुरू व्हावी, अशी अपेक्षा प्रवाश्यांकडून व्यक्त होत आहे.
मुंबई विमानसेवा पुरविणाऱ्या कंपनीकडून एक जानेवारी पासून आठवड्यातील सातही दिवस विमानसेवा देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र निम्मा महिना उलटूनही विमानसेवा पूर्ववत न झाल्यामुळे प्रवाशांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण पसरले होते अशातच पूर्वीप्रमाणेच आठवड्यातील तीनच दिवस विमानसेवा सुरू झाल्यामुळे आठवड्यातील सातही दिवस विमानसेवा कधी सुरू होणार अशी विचारणा प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
वेळापत्रक असे
मुंबईहून सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी कोल्हापूर साठी उड्डाण व १२ वाजून ५५ मिनिटांनी कोल्हापुरात लँडिंग, कोल्हापूरहून मुंबईसाठी १ वाजून १५ मिनिटांनी उड्डाण तर दुपारी २ वाजून २५ मिनिटांनी मुंबईमध्ये लँडिंग आठवड्यातील तीन दिवस नियमित विमानसेवा सुरू राहणार असल्याची माहिती कोल्हापूर विमानतळाचे संचालक कमलकुमार कटारिया यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.