Mumbai Murder Case: क्रूरतेचा कळस! सरस्वतीचे शरीराचे 20 तुकडे शिजवून कुत्र्यांना खाऊ घातले अन्...

दिल्लीतील श्रद्धा हत्याकांड सारखीच एक धक्कादायक घटना मुंबईमधून समोर आली
Mumbai Murder Case
Mumbai Murder CaseEsakal
Updated on

दिल्लीतील श्रद्धा हत्याकांड सारखीच एक धक्कादायक घटना मुंबईमधून समोर आली आहे. मुंबईत एका 56 वर्षीय व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या केली आणि नंतर करवतीने त्या मृतदेहाचे तुकडे केले. एवढेच नाही तर परिसरातील कोणालाही संशय येऊ नये आणि दुर्गंधी येऊ नये म्हणून तो एक एक करून मृतदेह फेकत राहिला. (Latest Marathi News)

या सरस्वती वैद्य हत्या प्रकरणाने मुंबईसह देशभरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. 56 वर्षीय लिव्ह-इन पार्टनर मनोज साहनी याने 32 वर्षीय सरस्वतीची ज्या पद्धतीने हत्या केली आणि तिच्या शरीरावर केलेल्या क्रूरतेने सर्वांनाच धक्का बसला आहे. मनोज साहनी याने सरस्वतीची गळा चिरून हत्या केली आणि नंतर करवतीने तिचे तुकडे केले, असे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे. (Marathi Tajya Batmya)

एवढेच नाही तर हे तुकडे तो कुकरमध्ये उकळून कुत्र्यांना खाऊ घालत होता. पोलिसांनी सांगितले की, बुधवारी संध्याकाळी फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी केली होती. या तक्रारीनंतर पोलीस घटनास्थळी पोहचले.(Marathi Tajya Batmya)

आरोपी मनोज साहनी दरवाजा उघडताच तो पळू लागला. पोलिसांनी त्याला पकडले आणि आत डोकावून पाहिले असता त्यांना मृतदेह सापडला. पोलिसांचे सांगितले की, ही हत्या 4 जून रोजीच झाली असावी आणि त्यानंतर मनोज मृतदेह लपवण्याचा प्रयत्न करत होता.

आरोपीने सांगितले की, तो मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये उकळून कुत्र्यांना खाऊ घालत असे. आरोपी मनोज साहनी हा गेल्या काही दिवसांपासून कुत्र्यांना काही तरी खाऊ घालत असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. हे तुकडे कुत्र्यांना खाऊ घालण्याचा प्रयत्न करत असल्यानं संशय बळावला. खोलीच्या आतून सरस्वतीच्या शरीराचा फक्त खालचा भाग सापडला आहे.(Latest Marathi News)

Mumbai Murder Case
Vasant More: वसंत मोरे लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात? भाजपची डोकेदुखी वाढणार

या घटनेनंतर नयानगर पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या मीरा रोड येथील गीता नगर कॉलनीत दहशतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना घडलेल्या इमारतीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आरोपींच्या सांगण्यावरून पोलिसांनी आतापर्यंत सरस्वतीच्या मृतदेहाचे १३ तुकडे जप्त केल्याचे बोलले जात आहे. (Marathi Tajya Batmya)

मनोजने सरस्वतीच्या मृतदेहाचे एकूण 20 तुकडे केले. दोघेही गीता नगरमध्ये तीन वर्षांपासून राहत होते आणि ते कोणाशीही फारसे बोलत नव्हते. मात्र, याआधी त्यांच्यात भांडण झाल्याचेही कोणी ऐकले नव्हते.(Latest Marathi News)

Mumbai Murder Case
Crime News: मुंबईत थरकाप उडवणारी घटना; लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये...

कुत्र्यांना कधीच काही खायला दिले नाही, तीन दिवस त्यांची कृती पाहून संशय बळावला

स्थानिक लोकांनी सांगितले की, आरोपी मनोज कधीच कुत्र्यांना काही खाऊ घालत नव्हता. गेल्या दोन-तीन दिवसांपासून तो कुत्र्यांना काहीतरी खायला घालताना दिसत होता. दिवसातून अनेकवेळा तो कुत्र्यांना खायला घालायचा. त्यामुळे त्याने सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे कुत्र्यांना खाऊ घातल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.(Marathi Tajya Batmya)

एवढेच नाही तर दुर्गंधी येऊ नये आणि कुत्रे सहज खाऊ शकतील यासाठी तो मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये उकळत असे. या घटनेने दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाची आठवण करून दिली आहे, जिचा लिव्ह-इन पार्टनर आफताबने तिचे 32 तुकडे करून जंगलात फेकले होते.(Latest Marathi News)

Mumbai Murder Case
Nashik Crime News: पंचवटीत किरकोळ वादातून हाणामारी अन् एकाची हत्या...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.