Mumbai Local Live: सध्या मुंबई आणि नवी मुंबई भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. काही दिवसांपासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे लोकल काही वेळा लोकल ट्रेनच्या वेळापत्रकावर याता मोठा परिणाम होतो. बुधवारी (दि.१९ जुलै) पनवेल स्थानकावर काही तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे पनवेलच्या दिशेने गाड्या थांबवण्यात आल्या आहेत.
आठवड्याभरापासून नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतं आहे. या पावसामुळे पनवेल स्थानकावर तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे मुंबईतून पनवेलला येणाऱ्या गाड्या बेलापूर स्थानकापर्यंतच येत आहेत आणि बेलापूर स्थानकापासून मागे फिरत आहेत.
या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचा खोळंबा झालाय. त्यांना पनवेलला जाण्यासाठी बेलापूरपासून पर्यायी व्यवस्था शोधावी लागत आहेत. (Latest Marathi News)
पावसाचा परिणाम सेन्ट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वेवरही मुसळधार पावसाचा परिणाम झालाय. सेंट्रल लाईनवर लोकल गाड्या २० ते २५ मिनिटांनी उशीरा धावत असून वेस्ट्रर्न लाईनच्या गाड्या सरासरी १० मिनिटे उशीरा धावतं आहेत. (Latest Marathi News)
अशातच, बदलापुर आणि अंबरनाथ या स्थानकांमधील लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. स्थानकावर पाणी साचल्याने ही वाहतूक बंद करण्यात आली आहे. पाण्याचा स्तर स्थानकात रुळाच्या वर आल्याने ही वाहतूक बंद करण्यात आलीये. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस ते बदलापुर आणि कर्जत ते अंबरनाथ येथील वाहतूक सुरु आहे.
यापूर्वी मुसळधार पावसामुळे नवी मुंबईमधील शाळांनी सु्ट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र, आता मुंबईत होणाऱ्या प्रचंड पावसामुळे नोकरदार वर्गाचेही हाल होतायेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.