बैल झुंज प्रकरण; मुंबईच्या माजी महापौर दत्ता दळवींसह 10 जणांना अटक

तळगाव येथे अनधिकृतरित्या बैलांच्या झुंजीचे आयोजन केल्याप्रकरणी अटक
Malvan
MalvanEsakal
Updated on

मालवण (सिंधुदुर्ग) : मालवण (Malvan) तालुक्यातील तळगाव गावडेवाडी तलावानजिक दोन दिवसांपूर्वी बैल (Bull) झुंजीचे अनधिकृतपणे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एका बैलाचा मृत्यू झाला. या प्रकरणात एका बैलाच्या मृत्यूस व अन्य बैलांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण, कुडाळ, वेंगुर्ले येथील १२ मुख्य संशयितांसह अन्य अज्ञात व्यक्तींविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी शिवसेनेचे मुंबईचे (Mumbai) माजी महापौर दत्ता दळवी (Mayor Datta Dalvi), शिवसेनेचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश पावसकर यांच्यासह १० जणांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

Malvan
मला भेटणारे शेतकरी आजही मलाच कृषीमंत्री समजतात-सदाभाऊ खोत

प्युअर अॅनिमल लव्हर (पाल) या प्राणी प्रेमी संस्थेच्या माध्यमातून सुप्रिया दळवी (रा. कोळंब, मालवण) यांनी येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, संशयितांवर भादवि कलम ४२९, ३४ यासह प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० कलम ११ नुसार गुन्हा दाखल झाला. तालुक्यातील तळगाव गावडेवाडी तलावानजिक दोन दिवसांपूर्वी बैल झुंजीचे अनधिकृतपणे आयोजन केले होते. याची छायाचित्रे, व्हिडिओ व्हायरल झाले. यात बैलांचा होत असलेला छळ, बैलांना झालेली दुखापतही स्पष्टपणे दिसत होती.

Malvan
बलात्कारातून जन्मलेल्या मुलीला मिळणार पोटगी; न्यायालयाचा आदेश

हजारो लोकांचा जमाव दिसून येत होता. या झुंजीत जखमी झालेल्या एका बैलाचा मृत्यू झाला. त्यानंतर प्राणी मित्र संघटनानी एकत्र येत त्या व्हिडिओ मधील व्यक्तींची खातरजमा केली. आयोजकांबाबतची माहिती मिळवली. त्यानुसार येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेत बैलांची अनधिकृत झुंज लावणे, बैलांना क्रूरतेने व अमानुष वागणूक देऊन एका बैलाच्या मृत्यूस व अन्य बैलांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्या प्रकरणी १२ प्रमुख संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या झुंजीत रुपेश पावसकर यांच्या मालकीच्या बैलाची विकी ऊर्फ सनी केरकर यांच्या मालकीच्या बैलाशी झुंज झाली. यात विकी केरकर यांचा बैल जखमी होऊन त्याला शिरोडा येथील डॉक्टरकडे उपचारासाठी नेले, मात्र त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी १० जणांना अटक झाली. आज सायंकाळी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. संशयितांतर्फे ॲड. स्वरूप पई यांनी काम पाहिले.

यामध्ये दत्ता दळवी (रा. तळगाव), बाळा पेडणेकर (रा. सुकळवाड), आझीम मुजावर (रा. नेरुर कुडाळ), बाबू ताम्हाणेकर (रा. सुकळवाड), अभि शिरसाट (रा. कुडाळ), आशिष जळवी (रा. कविलकट्टा कुडाळ), सुनील मांजरेकर (रा. नेरुर), अनिल मांजरेकर (रा. नेरुर), रुपेश पावसकर (रा. कविलगाव कुडाळ) विकी ऊर्फ सनी केरकर (रा. आसोली वेंगुर्ला), जयगणेश ज्ञानदेव पावसकर (रा. कविलगाव नेरुर) व शुभम नारायण कुंभार (रा. कुडाळ कुंभारवाडी) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.