BMC Election : मनसेचं 'घे भरारी' अभियान; मुंबई निवडणुकीसाठी महत्त्वाचा प्लान

BMC Election
BMC Electionesakal
Updated on

Mumbai MNS Meeting

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईमध्ये आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये मनपा निवडणुकीसाठीची रणनिती आखण्यात आली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी आज बैठीकचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मुंबईत मनसेडून 'घे भरारी' हे अभियान राबविण्यात येणार असल्याचं मनसे नेते प्रकाश महाजन यांनी सांगितलं.

हेही वाचाः जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

घे भरारी या अभियानांर्गत मनसेने आजपर्यंत केलेली कामं आणि पक्षाची भूमिका मांडण्यात येणार आहे. जनतेसमोर जाताना कशा पद्धतीने गेलं पाहिजे, कुठले मुद्दे मांडले पाहिजेत, यावर बैठकीमध्ये खल झाला.

BMC Election
Raj Thakceray: "...पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही"; राज ठाकरेंचा गंभीर इशारा

या निवडणुकीसाठी मनसेने सभांचंही नियोजन केलं आहे. मुंबईतल्या ३६ विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षाची किमान एक सभा होईल, असं नियोजन करण्यात आले. या सभांसाठी कोण बोलणार, हेही निश्चित करण्यात आलेलं आहे.

दरम्यान, मनसे युतीत लढणार की स्वबळावर; याच्या चर्चा सुरु आहेत. प्रकाश महाजन यांनी मात्र स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. या निवडणुकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जोरदार सभा होणार, हे मात्र निश्चित झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.