Monsson Session Legislative Assembly:सध्या महाराष्ट्रासह देशभरात मुसळधार पावसाचा धडाका सुरु आहे. गुजरात आणि दिल्ली सारख्या राज्यांमध्ये पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झालंय. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर तर पाऊस धुडगूस घालतोय. भारतीय हवामान खात्याने मुंबई आणि मुंबई उपनगराला पुढील ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला होता.
हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्यानंतर मुंबई आणि उपनगरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे विधानसभेचे पावसाळी अधिवेशन १५ दिवसांनी घेण्यात यावे अशी मागणी आमदार संजय कुटे विधानसभेत करणार आहेत.
यावेळी आमदार संजय कुटे यांनी मत मांडलं की अशा अतिवृष्टीच्या परिस्थितीत आमदारांना जनतेच्या मदतीसाठी त्यांच्या मतदार संघात असायला पाहिजे. अशा परिस्थीतीत प्रशासन जनतेच्या मदतीसाठी असणं गरजेचं आहे आणि अधिवेशनामुळे प्रशासन अडकून पडलंय, असे मत कुटे यांनी मांडले. संजय कुटे पुढे हेही म्हणाले की लोकांची अशी इच्छा आहे की आमदार आपल्या विभागात असावा.
भारतीय जनता पक्षाचे जळगाव मतदार संघाचे आमदार संजय कुटे विधानसभेचे पावसाळी अधिवेशन पुढे ठकलण्याची मागणी करणार आहेत. यावेळी ते म्हणाले की, "संपूर्ण राज्यात अतिवृष्टी सुरु आहे. मुंबईत भयंकर परिस्थिती आहे. त्यामुळे प्रशासन तिथे असणे गरजेचं आहे. सर्व आमदार इथेचं आहेत. आमच्या आमदारांमध्ये चर्चा सुरु आहे की मतदार संघात गेलं पाहिजे. आमचे मतदार संघात जाण्याचे प्रयत्न सुरु आहेत. माझी हीचं विनंती आहे की अतिवृष्टी आहे,त्यामुळे प्रशासन तिथे पोहोचणं गरजेचं आहे."
यापुढे ते म्हणाले की,"प्रशासानाला अधिवेशनात अडकवून न ठेवता मतदार संघात जाऊन मदत करणं गरजेचं आहे. लोकांची इच्छा आहे की आमदार आपल्या विभागात असावा. गावच्या गाव डूबलेले आहे तिथे प्रशासन पोहोचणे गरजेचं आहे. मी सभागृहात अशी मागणी करणार आहे की जर अधिवेशन करायचं आहे तर १५ दिवसांनी पुन्हा घेता येईल. मी कॅबिनेट आणि विरोधकांना ही विनंती करणार आहे."
सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन मुंबईमध्ये पार पडतं आहे. काही दिवसांपूर्वी लोकल ट्रेनची काही मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे विधानसभेतील कर्मचाऱ्यांना लवकर सोडण्यासाठी सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.