जन आशीर्वाद यात्रेतून भाजपाचे मोठे शक्तीप्रदर्शन असणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मुंबई - केंद्रीय खात्यामार्फत जनतेची सेवा करणार असून महाराष्ट्रात (maharashtra) अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देणार आहे. आजही बाळासाहेबांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. मुंबई महापालिका (mumbai municipal corporation) जिंकणं ही माझी जबाबदारी आहे, असे सूचक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी आज केले. भाजपाच्या (BJP) जनआशीर्वाद यात्रेला आजपासून मुंबईतून सुरुवात झाली आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान जनआशीर्वाद यात्रेसाठी प्रवीण दरेकरही सहभागी झाले आहेत.
यावेळी राणे म्हणाले, आजही माझ्यासोबत बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत. केंद्रीय खात्याच्या मदतीन राज्यात अधिक रोजगार उपलब्धतेसाठी प्रयत्न करणार आहे. दरम्यान बाळासाहेब यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करुन राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. केंद्रीय मंत्री झाल्यानंतर प्रथमच ते मुंबईत आले आहेत. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकारलाही त्यांनी अभिवादन केले आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. जन आशीर्वाद यात्रेतून भाजपाचे मोठे शक्तीप्रदर्शन असणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राणे पुढे म्हणाले, जनआशीर्वाद यात्रा आम्ही करत आहोत, शिवसेनेला टीका करण्याचा अधिकार काय?. केंद्रीय मंत्रीपद मिळालं म्हणून मी मुंबईत पहिल्यांदाच येत असल्यामुळे राज्यातील आणि मुंबईतील अध्यक्षांनी ही यात्रा काढली असून जनतेचा आशीर्वाद आम्हाला मिळावा व मोदींच्या मागे तो आशीर्वाद कायम रहावा, यासाठी चांगल्या हेतूने ही यात्रा काढण्यात आलीय. आम्ही आमचा पक्ष वाढवण्यासाठी चांगला मार्ग काढत आहोत. गेली 32 वर्षे मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून झोपडपट्टी, पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनला आहे, असेही त्यांनी सांगितले.
मुंबई का मागे राहिली?
भ्रष्टाचाराने माखलेली मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचारमुक्त, स्वच्छ सुंदर करावी म्हणून मुंबई महानगरपालिका काबीज करण्याचे आमचे प्रयोजन आहे. उद्धव ठाकरे यांच्या ज्या 56 जागा निवडून आल्या, त्यापैकी 26 आमच्या आहेत. आता महानगरपालिकेत त्यांनी पहावं आणि रडीचा डाव खेळू नये, असे त्यांनी स्पष्ट करत सेनेवर निशाणा साधला. मुंबई आणि महाराष्ट्रात जे काही असेल, ते फक्त भाजपचं असेल, असं सूचक वक्तव्यही राणेंनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.