आव्हाडांना जामीन मिळताच 'त्या' अधिकाऱ्याची गृहखात्याकडून उचलबांगडी; चर्चांना उधाण

मला अटक करताना पोलिसांवर दबाव होता
Jitendra Awhad
Jitendra AwhadEsakal
Updated on

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक करणारे पोलीस उपअधीक्षक विनय राठोड यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने परिमंडल पाचमधून डीसीपी राठोड यांची वाहतूक शाखेत बदली केली आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.

Jitendra Awhad
Maharashtra Politics: कीर्तीकर पिता-पुत्रात 'फाळणी'; वडील शिंदे गटात, तर मुलगा ठाकरे गटात

शुक्रवारी आव्हाड यांनी ट्विट करत सांगितलं होतं की मला अटक करताना पोलिसांवर दबाव होता डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही.

Jitendra Awhad
Bharat Jodo: हिंगोलीत राहुल गांधी भावूक; दिवंगत राजीव सातव यांची आठवण काढत म्हणाले...

वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल" तर त्यांना अटक झाल्यानंतर आज जामीन मंजूर झाला आहे. जामीन मंजूर होताच पुढच्या दोन तासांतच डीसीपी राठोड यांची गृहमंत्रालयाने ट्रान्सफर ऑर्डर काढली. डीसीपी राठोडांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे चर्चेला उधान आलं आहे.

जामीन झाल्यावर आव्हाडांनी पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका स्पष्ट केली. शिवाय व्हिडीओ दाखवून आव्हाड यांनी हर हर महादेव चित्रपटाला आपला विरोध का, हेही सांगितलं. आव्हाड यांनी जुन्या चित्रपटातील काही क्षणचित्र दाखवले. त्यानंतर हर हर महादेव चित्रपटातील अफजल खान वधाची क्षणचित्रे दाखवली. तसेच आपलाविरोध का हे स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.