Omicron Updates: जोखमीच्या देशातून आलेले आणखी 4 प्रवासी कोविड बाधित

मुंबईतील जोखमीच्या देशातून आलेल्या कोविड रुग्णांची संख्या पाच वर गेली आहे.
Omicron variant
Omicron variantsakal media
Updated on

मुंबई : मुंबईत आफ्रिका तसेच इतर जोखमीच्या देशातून आलेले आणखी 4 प्रवासी कोविड बाधित आढळलेले आहेत. मुंबईतील जोखमीच्या देशातून आलेल्या कोविड रुग्णांची संख्या पाच वर गेली आहे.

21 वर्षाचा पुरुष जो 10 नोव्हेंबर रोजी लंडनहून आला. तर 47 वर्षीय व्यक्ती 25 नोव्हेंबर रोजी मॉरिशसहून आलेली आहे. दक्षिण आफ्रिकेतून आलेला 39 वर्षांची व्यक्ती 25 नोव्हेंबर रोजी तर लंडनहून आलेला 25 वर्षांचा पुरुष जो रॅपिड अँटीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडला आहे तो 1 डिसेंबर रोजी पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.त्याच सोबत

Omicron variant
जळगाव : हिरापूरजवळ भीषण अपघात; तीन जण जागीच ठार

या प्रवाश्यांचा संपर्क ट्रेसिंग सुरू असून दक्षिण आफ्रिकेतील एक 36 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली असून तिला देखील सेव्हन हिल रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तर नमुना जिनोम सिक्वेन्सीग चाचणीसाठी पाठवला आहे.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लंडनहुन आलेले दोन प्रवासी कोविडबाधित असून मॉरिशस आणि दक्षिण आफ्रिकेतून आलेला एका रुग्णाचा यात समावेश आहे. पालिकेने त्यांना उपचारासाठी सेव्हन हिल रुग्णालयात पाठविले आहे. या प्रवाशांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे. हे सर्व प्रवासी कोविड बाधित असले तरी लक्षणेविरहित आहेत.यातील तिघांचे नमुने जिनोम सिक्वेन्सीग चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

मुंबई, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर आणि पुणे या भागात आफ्रिका आणि इतर जोखीमच्या देशातून आलेला प्रत्येकी एक प्रवासी कोविड बाधित आढळला होता. या प्रवाशांचे प्रयोगशाळा नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी यापूर्वीच पाठविण्यात आले आहेत.

Omicron variant
हातकणंगले : विवाह नोंदणीचा दाखला देण्याकरीता लाच घेणाऱ्यास अटक

सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. युरोप आणि ज्या देशांमध्ये ओमायक्रॉन आढळून आला आहे असे इतर 11 देशांमधून जे प्रवासी भारतात येत आहेत त्या प्रत्येकाची आर टी पी सी आर टेस्ट करण्यात येत असून जे प्रवासी यामध्ये पॉझिटिव्ह आढळतील त्यांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात येणार आहेत. जे प्रवासी आर टी पी सी आर निगेटिव्ह आढळतील त्यांनाही 7 दिवसांच्या क्वारंटाईननंतर पुन्हा टेस्ट करण्यात येईल आणि ते कोविड बाधित आढळल्यास त्यांच्या नमुन्याचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.