Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे'वर दरड कोसळली; मुंबईकडे जाणाऱ्या तीन लेन बंद

Mumbai-Pune Expressway landslide
Mumbai-Pune Expressway landslideesakal
Updated on

मावळ, ता. २३ : पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. दरम्यान, पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तिन्ही लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत.

Mumbai-Pune Expressway landslide
Shiv Sena : ''शिंदे गटाचं विसर्जन होणार, भाजपकडून तयारी पूर्ण'', ठाकरे गटाच्या मोठ्या नेत्याचं विधान

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील आडोशी गावाच्या हद्दीत रविवारी रात्री दरड कोसळली. त्यामुळे डोंगरभागातून मातीचा लगदा महामार्गावरील तिन्ही लेनवरती पडला. त्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तिन्ही लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत.

पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाताना बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर दररोज लाखो वाहनांची वर्दळ असते. सुदैवाने दरड कोसळली तेव्हा त्यामध्ये कोणतेही वाहन सापडले नाही. दरड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Mumbai-Pune Expressway landslide
India vs Pakistan: भारत पुन्हा फायनलमध्ये 'फेल',भारताचा १२८ धावांनी दारुण पराभव

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दरड कोसळल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक बंद करण्यात आली आहे. प्रवाशांनी सावधगिरी बाळगावी. आयआरबी कर्मचारी, बोरघाट वाहतूक पोलिस आणि खोपोली पोलिस ठाण्याचे अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून रस्ता खुला करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

- महामार्ग पोलिस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.