Aaditya Thackeray: मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य म्हणजे नाकर्तेपणाचा कळस, आदित्य ठाकरे संतापले थेट लाज काढली

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray
Updated on

Aaditya Thackeray:  आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी सरकारवर घोटाळ्याचा देखील आरोप केला . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाज वाटली पाहीजे. पहिल्याच पावसात मुंबई तुंबली, नालेसफाईची पाहणी मिंधे गट आणि भाजपने केली होती, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबईत वेगवेगळ्या रेस्ते कंत्राटांमध्ये घोटाळे झाले आहेत. सत्तेवर गद्दार खोके सरकार आहे. यांनी मोठे घोटाळे त्यांनी केले आहेत. मी अनेक रस्त्यांचे घोटाळे समोर आणले आहेत. सरकारला फक्त कंत्राटदारांची काळजी आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईकरांनी पावसाचे स्वागत केले. पण मुंबईत अशा ठिकाणी पाणी तुंबल, जिथे यापूर्वी कुठेच तुंबल नाही. मुंबईकर म्हणून मला एका वक्तव्याचा राग आहे.   ते वक्तव्य मुख्यमंत्र्यांचे आहे. "पाऊस आल्याचे स्वागत करा. मुंबईत पाणी तुंबलय याची तक्रार काय करता", हे वक्तव्य म्हणजे निर्लजपणाचं, नाकर्तेपणाचे आणि भ्रष्टाचाराचा कुठला चेहरा असेल तर ते हे खोके सरकार आहे.

Aaditya Thackeray
PM Modi In Egypt : PM मोदींचा पुन्हा एकदा गौरव! इजिप्तने सर्वोच्च पुरस्काराने केलं सन्मानित

घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांसाठी जेव्हा हायवे थांबवल्या जातील तेव्हा हे मुख्यंमंत्री लोकांना म्हणतील अरे ट्रफिकमध्ये अडकल्याची तक्रार काय करता, माझे स्वागत करा. मी आलोय, अहंकार मी कधी पाहीला नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. 

काय म्हणाले शिंदे ?

मुख्यमंत्री शिंदेंचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये मुख्यमंत्री शिंदे माध्यमांशी संवाद साधताना दिसत आहेत. यावेळी एका पत्रकाराने तुंबलेल्या मुंबईसंदर्भात सवाल उपस्थित केला असता. अपेक्षीत उत्तर न देत मुख्यमंत्री शिंदेंनी अजब उत्तर दिले असल्याचे पाहायला मिळालं.

पत्रकारांनी मुंबईत पहिल्याच पावसानंतर पाणी तुंबल्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “अरे बाबा, पाऊस झालं याचं स्वागत करा. पाणी साचलं हे काय. पाऊस झाला त्यावर बोलत नाहीत.”

Aaditya Thackeray
Sugarcane Crop : "किती माकड येतात ते बघतोच"; उसाचे रक्षण करण्यासाठी शेतकरी बनला अस्वल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.