मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ओलीपोर वलसाड इथं वाहतूक बंद करण्यात आली.
मुंबई-अहमदाबादवरील गुजरात आणि मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली असून वलासाड इथं वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
ठाण्यात गेल्या तासाभरात ३० मि.मी. अंधेरी 25 मिमी, मालाड 15 मिमी, बोरीवली 13 मिमी. मुंबई शहर 5-6 मिमी पेक्षा जास्त नाही. अंतर्गत भागात पावसाचा जोर अधिक सुरू आहे. मुलुंड, ठाणे, मुंब्रा, कल्याण, डोंबिवली येथे १५ मिनिटांपासून मुसळधार पाऊस पडत आहे.
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) गुरुवारी मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्टही जारी केला होता. यात प्रामुख्याने नाशिक, पुणे आणि पालघरचा भाग होता.
दरम्यान, आता पुन्हा एकदा पुढील २४ तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शिवाय महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे.
हवामान अंदाज
मुंबई शहर व उपनगरात मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी अति जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल. अधूनमधून ४५-५५ किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहतील तसेच ६० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
अखेर 15 तासांनी सुखरुप सुटका
पालघरमध्ये वैतरणा नदीला अचनाक आलेल्या पुरामुळे 10 कामगार अडकून पडले होते. यासर्व कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. मुंबई-बडोदा महामार्गावर उड्डाणपुलाचं काम सुरु असताना अचानक वैतरणा नदीला पूर आल्यानं कामगार अडकले होते. अखेर तब्बल 15 तासांनी सर्व कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.