रस्ते अपघातात मुंबई अव्वल, आकडेवारीतून धक्कादायक माहिती आली समोर

राज्यात २०२१ मध्ये २९ हजार ४९४ रस्ते अपघात झाले आहेत.
Accident
AccidentSakal Media
Updated on

मुंबई : महाराष्ट्रात रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. अनेक महामार्गांची कामेही युद्ध पातळीवर सुरू आहेत. मात्र तरीही अपघाता़चे प्रमाण कमी न होता, वाढत असून यात मुंंबईही (Mumbai) अव्वल असल्याची धक्कादायक माहिती महामार्ग पोलिसांच्या (Highway Police) आकडेवारीतून समोर आली आहे. राज्यात २०२१ मध्ये २९ हजार ४९४ रस्ते अपघात झाले आहे. यामध्ये १३ हजार ५२८ प्रवासी जखमी, तर रस्ते अपघातात १३ हजार ५२८ प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. विशेष म्हणजे राज्यातील सर्वाधिक अपघात हे मुंबईत होत असून २०२१ मध्ये मुंबईत दोन हजार २३० सर्वाधिक अपघात झाले आहेत. (Mumbai Top In Road Accident Cases, Highway Police Disclose Numbers)

Accident
'पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच्या युगातील कृष्ण भगवान'

त्यात ३८७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १९४२ जण अपघातात गंभीर जखमी झाल्याची नोंद आहे. अपघातांच्या आकडेवारीनुसार, २०२० च्या तुलनेत गेल्या वर्षी राज्यातील रस्ते अपघातात (Road Accident) १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मृत्यू आणि जखमींच्या संख्येत १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात २०२० मध्ये २४, ९७१ अपघात, ११, ५६९ मृत्यू आणि १९,९१४ जखमींची नोंद आहे. महामार्ग पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात (Maharashtra) रस्ते अपघातात दिवसाला कमीत-कमी ३७ ते ४० जणांचा मृत्यू होत असल्याचे सांगितले. वरील आकडेवारी पाहता साथीच्या रोगापेक्षाही ही रस्ते अपघातात मृत्यू होणारीची संख्या ही लक्ष वेधून घेणारी आहे.

Accident
आमदार, गृहनिर्माण मंत्रिपद भूषवूनही मुंबईत घर नाही; चंद्रकांत खैरेंची खंत

रस्ते अपघाताची प्रमुख कारणे अशी;

- वाहतूक नियमाचे उल्लंघन

- भरधाव वेगाने गाडी चालवणे

- मद्यपान करून वाहने चालवणे

सर्वाधिक अपघात या जिल्ह्यांमध्ये

- मुंबई २ हजार २३०

- नाशिक १ हजार ४२९

- पुणे १ हजार ३६३

- अहमदनगर १ हजार ३६०

- कोल्हापूर १ हजार ०३१,

- सोलापूर ९४५

- नागपूर ९६९

- सातारा ८१२

- यवतमाळ ७५५

- नांदेड ७५०

धोकादायक ठिकाणे

रस्ते अपघातासाठी वरील कारण जरी महत्वाची असली. तरी महामार्गावरील काही धोकादायक ठिकाणही (ब्लॅकस्पाॅट) यासाठी जबाबदार आहेत. याच ठिकाणी अनेक अपघात प्रामुख्याने होत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील प्रमुख महामार्गांवर ३०० अशी ठिकाणांची नोंद करण्यात आली आहेत. यात मुंबई, नादेंड, नागपूर, नाशिक, सातारा, कोल्हापूर आणि औरंगाबाद या जिल्ह्यात सर्वाधिक धोकादायक ठिकाण असल्याची नोंद करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()