Mumbai University Election: मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकांना शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली आहे. या निवडणुकीसाठी मनसे आणि ठाकरे गटाने मोठी तयारी केली होती. मुंबई विद्यापीठ निवडणूक ठाकरे गटासाठी अस्तित्वाची लढाई आहेत तर मनसेला आपली ताकद दाखवण्याची मोठी संधी या निवडणुकीत होती. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या निवडणुकीसाठी थेट मैदानात उतरले होते. मात्र राजपुत्र विरुद्ध उद्धवपुत्र यांची लढाई होण्यापूर्वी मुंबई विद्यापीठ शासनाच्या निर्देशानुसार सामना रद्द केला.
विद्यापीठाने जाहीर केलेली निवडणूक येत्या १० सप्टेंबरला होणार होती. या निडणुकीसाठी ठाकरे आणि मसनेने चांगली तयारी केली होती. मात्र रातोरात पत्रक काढून निवडणूक स्थगित केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी वाढली आहे. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक का महत्वाची आहे, सरकारने ही निवडणूक का रद्द केली, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
ठाकरे गटात बंड झाल्यानंतर ही सर्वात मोठी निवडणूक मानल्या जाते. त्यामुळे आदित्य ठाकरे मैदानात उतरले होते. शिंदे गटावर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ठाकरे गटाला मोठी संधी या निवडणुकीतून होती. ठाकरे गटाच्या युवासेना आणि मनसे विद्यार्थी सेनने आपआपल्या उमेदवारांचे अर्ज भरण्याची तयारीही केली होती. ही निवडणूक झाली असती तर ठाकरे बंधुंचे विद्यापीठावर वर्चस्व असते, असे भाजपला नको होते म्हणून निवडणूक स्थगित केल्याची देखील चर्चा आहे.
अमित ठाकरेंची पहिलीची निवडणूक -
अमित ठाकरे यांचीही ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाचीही कसोटी लागणार होती. मात्र,विद्यापीठाने निवडणुकीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थी संघटनेत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. भाजप-शिंदे गटाती तयारी अपूरी पडल्यामुळे हा निर्णय झाला का?, अशी चर्चा रंगली आहे.
सरकारचा हस्तक्षेप-
विद्यापीठाने काल रात्री प्रसिद्ध केलेल्या पत्रकात शासन पत्राच्या आदेशाने निवडणुका स्थगित केल्याचे म्हटले आहे. यामुळे सरकार विद्यापीठ निवडणुकीत हस्तक्षेप का करत आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारची तयारी होईल तेव्हा निवडणूक होईल का?, असा प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
ठाकरे गटापेक्षा शिंदे गटाची कमी मतदार नोंदणी-
८४ हजारांपेक्षा जास्त मतदारांची नोंदणी झाली होती. सर्वात कमी नोंदणी किंवा दखल घेतली नाही ते शिंदे गटाच्या युवासेनेने. शिंदे गटाच्या युवासेनेने जास्त नोंदणी केली नाही. परंतू इतर संघटना अभाविप, ठाकरे गट युवासेना, मनविसेने यांनी मतदार नोंदणीत मोठी ताकद लावली होती. जास्त नोंदणी ठाकरे गटाच्या युवासेनेने केली होती. सर्व गटाच्या उमेदवारांनी आद अर्ज भरण्याची पूर्ण तयारी केली होती. (mumbai latest news)
शिंदे गटाच्या आग्रहामुळे निवडणूक स्थगित? -
अभाविपने सिंधदुर्ग रत्नागिरीपासू मुंबई, पालघर पर्यंत सगळीकडे बैठका घेऊन उमेदवार दिले होते. ही सगळी तयारी असताना रात्री केवळ शिंदे गटाच्या आग्रहाखातर हा निवडणूक स्थगित केली असावी, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. विद्यापीठाला ऐनवेळी रात्री ११ वाजता निर्णय का घ्यावा लागला, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
मतदार नोंदणीत चुका?
मतदार नोंदणीत चुका झाला असा आरोप होता. मात्र या त्रुटी सुधारण्यासाठी विद्यापीठाणे अनेकवेळा संधी दिली होती. अनेकदा मागणी करुन देखील विद्यापीठाने ऑफलाइन नोंदणी केली नव्हती. ठाकरे गटाच्या युवासेनेने ऑनलाइन नोंदणीला विरोध केला होता. मात्र शेवटपर्यंत विद्यापीठ आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे मतदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
विद्यापीठावर आतापर्यंत ठाकरे गटाचे वर्चस्व -
आधल्या दिवशी निवडणुका स्थगित करण्यामागे म्हणजे यामागे शिंदे गटाचा हात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या युवासेनेने केला आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. विद्यापीठावर आतापर्यंत ठाकरे गटाचे वर्चस्व होते. नोंदणीमध्ये सर्वात अग्रेसर ठाकरे गटाची युवासेना आहे. त्यानंतर मनविसे आणि अभाविपचा नंबर लागतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.