मुंबई शहराचा (Mumbai City) विचार यापूर्वीच्या सरकारांनी गांभीर्यानं केला पण तो सोन्याचं अंड देणारी कोंबडी या अर्थानं केला. या मुंबईमुळं राज्यकर्ते श्रीमंत झाले पण या मुंबईची देखभाल केली गेली नाही. आता महाविकास आघाडी सरकारनं (MVA Govt) मुंबईच्या विकासासाठी प्राधान्य देत आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गुरुवारी विधानसभेत केलं. (Mumbai was always thought as an golden egg laying hen says Uddhav Thackeray aau85)
मुंबईच्या विकासाच्या दृष्टीनं मांडलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदींवर मुख्यमंत्री बोलत होते. राज्यातील विविध वर्गातील लोकांसाठी ज्या गृहनिर्माण योजना महाविकास आघाडी सरकारनं आणल्या आहेत, याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुख्यमंत्री म्हणाले, "महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी मांडला. देशाच्या आर्थिक भार सोसणाऱ्या मुंबईच रुप कसं असेल? हे दर्शवणारा हा अर्थसंकल्प आहे. मुंबई अन्न वस्त्र मिळतं पण पाठ टेकायला घर नसतं. त्यामुळं सर्व वर्गातील लोकांच्या घरांसाठी सरकारनं विचार केला आहे. मुंबईचा यापूर्वी गांभीर्यानं कोणी विचार केला नव्हता. मुंबईचा विचार केला गेला पण सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणूनच केला गेला. हे सोन्याचं अंड घेऊन जातात, पण त्या कोंबडीची देखभाल कोण करणार?"
आमदारांसाठी मुंबईत कायमस्वरुपी घरं
मुख्यमंत्री म्हणाले, "तीनशे आमदारांसाठी आपण घरं बाधणार आहोत. सर्वपक्षीय लोकप्रकतीनिधींसाठी मुंबईत कायमस्वरुपी घरं महाविकास आघाडीचं सरकार देणार आहे. त्याचबरोबर रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती देण्यासाठी सरकार अॅमनेस्टी स्कीम आणत आहे"
म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवणार
म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या घरासाठी येणाऱ्या अडचणी दूर करुन देशात सर्वात उत्तम उदाहरण निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे आम्ही केवळ प्रयत्न नव्हे तर करुन दाखवणार आहोत. तसेच गोरेगावची पत्रा चाळ (सिद्धार्थ नगर) चा वाद सोडवला. बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात झाली. नोकरदार आणि शिक्षणसाठी आलेल्या महिला आणि विद्यार्थीनींसाठी आपण वसतीगृह बांधणार आहोत, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
सफाई कामगारांच्या घरांचा विचारही या धोरणात करण्यात आला आहे. ज्या प्रमाण ग्रामीण भागातील लोकांना आपण घरं देतो तसेच शहरी भागातील कष्टकऱ्यांनाही आपण घरं देणार आहोत. महाविकास आघाडीचं सरकार हे करुन दाखवणार सरकार आहे, असंही यावेळी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.