Honey Trap in Mumbai: मुंबई पोलिसांनी दीड वर्ष जुन्या हनी ट्रॅप केसचा छडा लावला आहे. पोलिसांनी ही खटल्याचा छडा लावताना चार्जशीट दाखल करत खळबळजनक खुलासा केलाय. चार्जशीटनुसार, एका महिलेने ६४ वर्षीय व्यावसायिकावर मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बलात्काराच्या प्रयत्नाचा आरोप लावला होता आणि दावा केला होता की बलात्काराच्या प्रयत्नात ती जखमी देखील झाली होती.
दीड वर्षानंतर मुंबई गुन्हे शाखेने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये दावा केलाय की त्या महिलेने बलात्काराच्या प्रयत्नात विरोध करताना जखमी झाल्याचे नाटक केलं होतं आणि पोलिसांना जे हाताला लागलेलं रक्त दाखवलं होतं ते मुळात कोंबडीच रक्त होतं.
चार्जशीटमध्ये पोलिसांनी म्हटलंय की मोनिका भगवान उर्फ देव चौधरी नावाच्या महिलेने आपल्या तीन सहकाऱ्यांसोबत हनी ट्रॅपचा कट रचला आणि त्या व्यावसायिकाकडून ३ कोटी रुपये उकळले होते.(Latest Marathi News)
गुन्हे शाखेच्या युनिट १०ने मागच्या आठवड्यात मोनिका चौधरी आणि तिचे तीन सहकारी अनिल उर्फ आकाश चौधरी, लुबना वजीर उर्फ सपना आणि ज्वेलर मनिष सोदी यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलंय.
मुंबई गुन्हे शाखेच्या अनुसार, कोल्हापुरच्या एका व्यापाऱ्याशी या आरोप्यांमधील अनिल चौधरी याची पहिली भेट २०१६मध्ये गोवा येथे झाली होती. या दोघांची मैत्री इतकी घट्ट झाली जेव्हाही व्यापारी एखाद्या मिटींगसाठी मुंबईला यायचा तेव्हा तो अनिल चौधरीला नक्की फोन करायचा.
पोलिसांनी खुलासा केला की, ब्लॅकमेलिंगचे हे सत्र २०१७पासून सुरु झाले, जेव्हा अनिल चौधरी आणि सपनाने व्यावसायिकाशी मैत्री केली. त्यांनी त्या व्यापाराच्या संपत्तीचा आढावा घेतला आणि त्याला फसवण्याची योजना आखली. (Latest Marathi News)
पोलिसांच्या चार्जशीटमध्ये पुढे सांगण्यात आलं की, जेव्हा व्यावसायिक २०१९मध्ये मुंबईमध्ये होता आणि एका पंचतारांकित हॉटेलमध्ये डीनरसाठी बोलवलं. अनिल यावेळी लुबना वजीरबरोबरच मोनिका देव नावाच्या आणखी एका महिलेला घेऊन गेला.(Latest Marathi News)
मोनिकासोबत मनिष सोदी हाही होता. मग तो फोन आल्याचा दिखावा करत बाहेर आला, पण मोनिका आणि लुबना तिथेच होत्या.
काही वेळानंतर मोनिकाने गोंधळ घालायला सुरुवात केली की व्यावसायिकाने तिच्यासोबत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि त्याने तिला मारहाणही केली.
यावेळी मोनिकाने गोंधळ करत व्हिडीओही शूट केला. या व्हिडीओच्या आधारे ही गॅंग या व्यावसायिकाला ब्लॅकमेल करत होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.