महापालिकेचा इशारा! ३१ ऑगस्टपर्यंत कर भरा, अन्यथा मालमत्तेवर चढेल बोजा; ५ ते ६ टक्क्यांची सवलत आता ३१ ऑगस्टपर्यंतच

महापालिकेने मिळकत कर भरण्यासंदर्भातील बिले दिली आहेत, पण अद्याप ७५ टक्के लोकांनी बिले भरलेली नाहीत. त्यांना ३१ ऑगस्टपर्यंत मुदत असून, त्यानंतर धडक कारवाई करून नळ कनेक्शन तोडणे, मालमत्ता सील करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.
solapur mahapalika
solapur mahapalikasakal
Updated on

सोलापूर : महापालिकेने मिळकत कर भरण्यासंदर्भातील बिले मिळकतदारांना दिली आहेत, पण अद्याप ७५ टक्के लोकांनी बिले भरलेली नाहीत. त्यांना ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली असून, त्यानंतर धडक कारवाई करून नळ कनेक्शन तोडणे, मालमत्ता सील करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

महापालिकेच्या उत्पन्नातूनच शहरातील नागरिकांना सोयी-सुविधा पुरवणे शक्य आहे. दरवर्षी महापालिकेला करातून ३०८ कोटी रुपये अपेक्षित आहेत. मात्र, अनेकजण कर भरणा करीत नाहीत आणि त्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. महापालिकेच्या तिजोरीत पैसा शिल्लक नसल्याने अनेक शासकीय योजना, प्रकल्पांचा हिस्सा भरायला सुद्धा महापालिकेकडे पुरेसा निधी नसतो ही वस्तुस्थिती आहे.

शहरातील दोन उड्डाणपुलांच्या भूसंपादनासाठी महापालिकेला ‘इन्फ्रा’कडून कर्ज घ्यावे लागले आहे. पण, आता प्रत्येक मिळकतदारांनी नियमित व वेळेवर कर भरावा, यादृष्टिने महापालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी वेळेत बिलांचे वाटप, मिळकतींची अपडेट माहिती, वेळेत कर भरणाऱ्यांना सवलत, असे उपाय केले जात आहेत. दरम्यान, तरीदेखील कर न भरल्यास आता संबंधितांवर कारवाई केली जाणार असून त्यांचे नळ कनेक्शन कापले जाणार असून व्यावसायिकांचा गाळा, दुकान सील केले जाणार आहे.

सहा दिवसात टॅक्स भरा अन् सवलत मिळवा

महापालिकेचा कर भरण्यासाठी आता प्रशासनाने ३१ ऑगस्टपर्यंत डेडलाईन दिली आहे. या काळात कर भरणाऱ्यांना पाच व सहा टक्क्यांपर्यंत सवलत दिली आहे. ऑफलाईन कर भरणाऱ्याला एकूण कर रकमेतील पाच टक्के तर ऑनलाइन कर भरणाऱ्यांना सहा टक्के सवलत देण्यात आली आहे. १ सप्टेंबरपासून ही सवलत बंद होणार असल्याने नागरिकांनी मुदतीत कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर संकलन प्रमुख युवराज गाडेकर यांनी केले आहे.

महापालिका कराची सद्य:स्थिती

  • एकूण मिळकतदार

  • २,४९,३६८

  • अपेक्षित कर भरणा

  • ३०८ कोटी

  • आतापर्यंत वसुली

  • ७० कोटी

  • अजून वसुलीचे उद्दिष्ट

  • २३८ कोटी

...तर मालमत्तेवर कराचा बोजा चढणार

सोलापूर शहरातील अनेक मिळकतदारांनी महापालिकेचा कर भरलेला नाही. अनेकांकडे थकबाकीची मोठी रक्कम असूनही त्यांचे त्याकडे दुर्लक्षच आहे. त्यामुळे आता सर्वाधिक थकबाकी असलेल्या खुल्या जागांचा जाहीर लिलाव किंवा त्या मालमत्तेवर बोजा चढविण्याची कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, १ सप्टेंबरपासून अशीच कारवाई इतर बड्या थकबाकीदारांवरही होईल, असेही कर संकलन विभागाने ‘सकाळ’ला सांगितले. यंदा अभय योजना नसल्याचेही आयुक्त शीतल तेली-उगले यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.