दुसरीत शिकणाऱ्या चिमुरडीवर बलात्कार करून खून; नराधमाला अटक

Satara Crime news
Satara Crime newsesakal
Updated on
Summary

गिरणीतून दळण घेवून घराकडे आलेल्या आजीच्या लक्षात हा प्रकार आल्यावर शोधाशोध करण्यात आली.

ढेबेवाडी (सातारा) : विभागातील एका गावातील सात वर्षीय चिमुरडीचा मृतदेह कालरात्री गावातीलच एका ओघळीत आढळून आला. बलात्कार करून तिचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून याप्रकरणी संतोष चंद्रु थोरात (रा. सुतारवाडी, रुवले, ता. पाटण) या संशयिताला पोलिसांनी (Dhebewadi Police) अटक केलीय.

Satara Crime news
ममता बॅनर्जींच्या पक्षानं वाढवली काँग्रेस नेत्यांची चिंता

याबाबतची माहिती अशी, संबंधित सात वर्षीय बालिका दुसरीच्या वर्गात शिकते. काल दुपारी साडेतीनच्या सुमारास ती बाहेर खेळायला गेली. मात्र, उशिरापर्यंत घराकडे परतली नाही. गिरणीतून दळण घेवून घराकडे आलेल्या आजीच्या लक्षात हा प्रकार आल्यावर शोधाशोध करण्यात आली. मात्र, ठावठिकाणा न लागल्याने पोलिसांना कळविण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देवून कसून तपास सुरू केला.

Satara Crime news
अब्जाधीश रतन टाटांनी छोटासा केक कापून साधेपणाने साजरा केला 'वाढदिवस'

एकावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता, या प्रकरणाचा उलगडा झाला. संतोष चंद्रु थोरात असं संशयिताचं नाव आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस त्या मुलीच्या मृतदेहापर्यंत पोहचले. संशयितानं बलात्कार करून तिचा गळा आवळून खून केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक रणजित पाटील (Ranjit Patil) यांनी भेट देवून तपासकामी पोलिसांना सूचना दिल्या. कऱ्हाड येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()