Murlidhar Mohol: पुण्याचा मुरलीधर दिल्लीत धुरंदर! मोहोळ यांनी घेतली राज्यमंत्री पदाची शपथ

Union Minister Murlidhar Mohol: गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करणारे मोहोळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे त्यांना खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपदाची संधी मिळाली.
Murlidhar Mohol Union Minister Swearing In Ceremony
Murlidhar Mohol Union Minister Swearing In CeremonyEsakal
Updated on

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. यानंतर आज झालेल्या एनडीए सरकारच्या शपथविधीमध्ये मुरलीधर मोहोळ यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मुरलीधर मोहोळ यांनी जवळपास सव्वा लाख मतांनी विजय मिळवला. त्यांच्यासमोर कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांचे आव्हान होते. त्यामुळ ही निवडणूक चुरशीची झाली होती.

गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करणारे मोहोळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे त्यांना खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपदाची संधी मिळाली.

मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची संधी मिळाल्यामुळे पुण्यात त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.

आतापर्यंत, पुण्याला चार केंद्रीय मंत्री मिळाले होते. त्यामध्ये एन.व्ही. गाडगीळ, मोहन धारिया, व्ही.एन. गाडगीळ, सुरेश कलमाडी आणि एन.जी. गोरे यांचा समावेश होता. मोहोळ हे आता केंद्रीय मंत्री झालेले पुण्याचे पाचवे खासदार असणार आहेत.

Murlidhar Mohol Union Minister Swearing In Ceremony
Raksha Khadse: यंदा हॅट्रिकसह मंत्रीपद मिळवणाऱ्या रक्षा खडसे कोण आहेत? वाचा, एका क्लिकवर

पुण्याचे माजी महापौर मोहोळ यांनी पुणे लोकसभा जागेसाठी भगवा पक्षाचे निवडणूक प्रभारी म्हणून काम केले.

अलीकडच्या काळात, विविध सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांनी सक्रियपणे सामुदायिक संबंध वाढवले ​​आहेत. या उपक्रमांमध्ये ‘महाराष्ट्र केसरी’ सारख्या कार्यक्रमांचे आयोजन करणे आणि मोठ्या प्रमाणात रक्तदान मोहिमेचे आयोजन करणे यासह इतरांचा समावेश आहे.

Murlidhar Mohol Union Minister Swearing In Ceremony
Muralidhar Mohol : पहिल्यांदाच खासदार बनलेल्या पुण्याच्या मोहोळांना मंत्रि‍पदाची लॉटरी

मोहोळ यांनी अलीकडच्या काळात, विविध सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करून सर्वच क्षेत्रातील लोकांशी चांगले संबंध निर्माण केले होते. या कार्यक्रमांमध्ये ‘महाराष्ट्र केसरी’ सारख्या स्पर्धेचे आयोजन करणे आणि मोठ्या प्रमाणात रक्तदान मोहिमेचे आयोजनांचा समावेश आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी मोहोळ यांची जवळीक त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळवूण देण्यात निर्णायक ठरली.

तीन दशकांपूर्वी मोहोळ यांनी भाजपमध्ये राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यानंतर ते नगरसेवक झाले व पुढे महापौरपदही पटकावले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com