मुंबईः संगीतकार-गायक, दिग्दर्शक आणि मुलाखतकार म्हणून नावारुपाला आलेला अवधूत गुप्ते याच्या मनात नेमका कुठला पक्ष? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कारण अवधूत अनेक पक्षाच्या स्टेजवर दिसतो आणि त्यांच्यासाठी गाणीही लिहितो. प्रत्येक कलाकाराच्या मनात एक पक्ष असतो तसा अवधूतच्या मनातही आहे. त्याबद्दल आज त्याने स्पष्टपणे सांगितलं.
सध्या अवधूत गुप्तेच्या खुपते तिथे गुप्ते या शोची चर्चा आहे. या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे, संजय राऊत, नारायण राणे यांच्यासह राज्यातील दिग्गज नेते सहभागी झाले. प्रत्येक पक्षाशी आणि नेत्याशी अवधूत गुप्तेचे स्नेहाचे संबंध आहेत.
अवधूत गुप्तेने शिवसेनेसाठी तब्बल १० वर्षे काम केलं. बाळासाहेब ठाकरेंचे आणि गुप्तेचे संबंध चांगले होते. त्यानंतर मनसेसाठीही त्याने गाणी लिहिली. शिवाय राष्ट्रवादीसाठी गाणं दिलं. त्यामुळे अवधूत सर्वांसोबत असल्याचं नेहमी दिसून येतं. आत्ताच झालेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त तो एकनाथ शिंदेंच्या स्टेजवर दिसून आला आणि गाणंही गायलं.
आज अवधूत गुप्तेला कोणत्या राजकीय पक्षात आहेस? असं विचारण्यात आलं. त्यावर अवधूतने दिलेलं उत्तर लक्षवेधी आहे. आम्ही कलाकार आहोत. परंतु आम्ही उघड्या डोळ्यांनी सगळं बघतो, आम्हांला सगळं कळतं. असं त्याने म्हटलं आहे.
काय म्हणाला अवधूत?
आमच्या मनामध्ये एक पक्ष असतो. मात्र कामामुळे तो पक्ष आम्हाला लोकांसमोर आणता येत नाही. आम्ही कुठल्यातरी पक्षाचे असतोच, पण ते आम्ही जाहीरपणे सांगू शकत नाहीत. आम्ही कलाकार म्हटल्यानंतर आम्हाला कोणताही पक्ष नाही, असं म्हटलं जातं. पण आम्ही काय वेडे, आंधळे आहोत का? आम्हाला ऐकायला येत नाही का? आम्हाला सगळं दिसतं, असं अवधूतने म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.