बॉलिवूडमधील मुस्लीम टक्क्यावर पवारांचं मोठ विधान; म्हणाले, त्यांच्याकडे दुर्लक्ष...

सध्या बॉलिवूडमधील सिनेमांवर बहिष्कार घालण्याचा ट्रेन्ड सुरु आहे.
Sharad Pawar
Sharad Pawarsakal
Updated on

नागपूर : बॉलिवूडमधील मुस्लीम टक्क्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. मुस्लीम अल्पसंख्यांकांचं बॉलिवूडमध्ये मोठं योगदान आहे, याकडं आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. (Muslim minorities have contributed most to Bollywood says Sharad Pawar)

देशातील अल्पसंख्यांक मुस्लीम समाजाचं आणि उर्दू भाषेचं जवळपास सर्वच क्षेत्रात मोठं योगदान आहे. यामध्ये कला, लेखन, कविता यांचा समावेश आहे. त्यामुळेच बॉलिवूडला टॉप पोझिशनला पोहोचवण्यातही मुस्लिमांचं योगदान मोठं असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

Sharad Pawar
संगमनेर: आंघोळीसाठी तळ्यात उतरलेल्या चौघा भावांचा शॉक लागून मृत्यू!

दरम्यान, सध्या बॉलिवूडमधील मुस्लीम कलाकारांना टार्गेट केलं जात आहे. त्यांच्या सिनेमावर बहिष्कार घातले जात आहेत. नुकताच आमिर खानचा लाल सिंह चड्ढा या सिनेमावर बहिष्कार घालण्याची मोहिमत सोशल मीडियावर चालवली गेली. त्याचा फटका या सिनेमाला बसला. त्यानंतर आता सैफ अली खानची प्रमुख भूमिका असलेल्या आदिपुरुष सिनेमाबाबतही तेच घडताना पहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.