मुंबई: राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कवर केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा झाली. राज ठाकरेंनी 'यू टर्न' घेतला असा टीकेचा सूर होताच शिवाय त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला कृतीकार्यक्रमही वादग्रस्त ठरला. मशीदीच्या समोर भोंगे लावून हनुमान चालिसा लावा, हे त्यांचं विधान चांगलंच वादग्रस्त ठरलं. राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेनेवर केलेली टीकाही चर्चेस पात्र ठरली असली तरी राज यांनी पुन्हा यू टर्न घेत हिंदू-मुस्लिम विद्वेषाचंच राजकारण स्विकारल्याचं विरोधकांनीही म्हटलंय. राज यांनी आता घेतलेली भूमिका त्यांच्या पक्षवाढीस आणि मिळणाऱ्या मतांमध्ये परिवर्तीत होईल का, हा खरा प्रश्न उरतो. पक्षाला नवसंजिवनी देण्यात ते यशस्वी ठरतील का, या आणि अशा विषयांवर चर्चा सुरु असतानाच मनसेचे मुस्लिम मनसैनिक आता नाराज झाले असून राजीनाम्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. (Raj Thackeray)
मनसेने राज ठाकरे यांचा आदेश ऐकून दुसऱ्याच दिवशी काही ठिकाणच्या मशीदीसमोर भोंगे लावत हनुमान चालिसाही लावली. मात्र, त्यांची ही भूमिका आता त्यांच्या कार्यकर्त्यांनाही पटलेली दिसत नाहीये. पुण्यातील माजीद अमीन शेख हे वॉर्ड क्रमांक 84 शाखा अध्यक्ष असून त्यांनी आता राजीनामा दिला आहे. तसेच मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटलंय की, आमच्या भावना कुठे व्यक्त करायच्या? आज समाजात सामोरे जाताना जाणीव झाली. 16 वर्षांचा फ्लॅश बॅक आठवला आणि डोळ्यात पाणी आलं, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच मुस्लिम पदाधिकारी बैठक घेऊन पुढील निर्णय घेतील असंही त्यांनी म्हटलंय. (MNS)
माजीद शेख यांनी आपला राजीनामा सोपवताना म्हटलंय की, मागील काही दिवसांपासून राज्यात बेरोजगारी, महागाई, शिक्षण यासारखे विषय महत्त्वाचे असताना, हे मुद्दे सोडून जात-धर्म या विषयावर भर दिला जात आहे. या सगळ्या कारणास्तव मी कोणाच्याही दबावाखाली न येता स्वच्छेने राजीनामा देत असल्याची माहिती माजीद अमीन शेख यांनी आपल्या राजीनामा पत्रात दिली आहे. त्यांच्या या राजीनाम्यानंतर मनसेचे अनेक मुस्लिम कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती समोर येत आहे. (Raj Thackeray)
यावर मनसेचे संदीप देशपांडे म्हणाले की, त्यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे. संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी त्यांच्याशी चर्चा करतील. बरेचदा गैरसमज काही लोकं करुन देतात. पण त्यांचे गैरसमज दूर केले जातील.
राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरे यांनी म्हटलं होतं की, मुंबईतील मशिदी आणि मदरशांमध्ये देशविरोधी कृत्ये सुरू आहेत. तसेच घातपाती कारवायांची भयानक कटकारस्थाने कशी सुरू आहेत, याची माहिती तुम्हाला पोलिस देतील. पुढे ते म्हणाले की, मशीदीमध्ये मोठ्याने अजान होत असेल तर त्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावा. (Raj Thackeray)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.