Sambhajinagar News: रामगिरी महाराजांचे वादग्रस्त विधान, 'त्या' व्हायरल व्हिडिओमुळे छ. संभाजीनगरमध्ये तणाव, सध्या परिस्थिती काय?

Imtiaz Jaleel: ''तो महाराज आहे की गुंड हाच प्रश्न आहे. त्याची भाषा निंदनीय आहे. जगामध्ये जेवढे मुस्लिम बांधव आहेत त्यांच्या भावनांना दुखावण्याचं काम महाराजांनी केलं आहे. हे सगळं स्क्रिप्टेड आहे.''
Sambhajinagar News: रामगिरी महाराजांचे वादग्रस्त विधान, 'त्या' व्हायरल व्हिडिओमुळे छ. संभाजीनगरमध्ये तणाव, सध्या परिस्थिती काय?
Updated on

छत्रपती संभाजी नगरः छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर येथे मुस्लिम समाज संतप्त झाला आहे. रामगिरी महाराजांनी केलेल्या विधानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या विरोधामध्ये समाजबांधव एकत्र जमले होते.

माजी खासदार तथा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी नाव न घेता रामगिरी महाराजांचा कडक शब्दात निषेध केला आहे. एका प्रवचनात रामगिरी महाराजांनी वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर मुस्लिम बांधव वैजापुरामध्ये एकत्र जमले होते.

''महाराजाने केलेल्या भाषेचा वापर निंदनीय आहे. ते धर्मगुरु नाहीत की कुठले महाराज नाहीत. ते जे बोलले ते सगळं स्क्रिप्टेड होतं. त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये महाराजांविरोधात रोष आहे.'' अशी प्रतिक्रिया माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.

Sambhajinagar News: रामगिरी महाराजांचे वादग्रस्त विधान, 'त्या' व्हायरल व्हिडिओमुळे छ. संभाजीनगरमध्ये तणाव, सध्या परिस्थिती काय?
Haryanna, J&K Vidhan Sabha Election: हरयाणा, जम्मू-काश्मीरची विधानसभा निवडणूक अखेर जाहीर; कलम ३७० हटवल्यानंतर होणार पहिलीच निवडणूक

जलील पुढे म्हणाले की, तो महाराज आहे की गुंड हाच प्रश्न आहे. त्याची भाषा निंदनीय आहे. जगामध्ये जेवढे मुस्लिम बांधव आहेत त्यांच्या भावनांना दुखावण्याचं काम महाराजांनी केलं आहे. हे सगळं स्क्रिप्टेड आहे.

दुसरीकडे रामगिरी महाराज म्हणाले की, आम्ही जे बोललो ते बोललो आहोत. आम्हाला जे बोलायचं होतं ते झालं आहे. सध्या सप्ताह सुरु आहे. त्यामुळे यावर काही बोलू शकत नाही. त्यानंतर जे घडेल ते बघू.

छत्रपती संभाजीनगर शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्यासमोरही मुस्लिम समाजबांधव जमले होते. सिटी चौकात जमलेला जमाव आता पांगवण्यात आलेला आहे. पोलिसांनी सर्वांची समजूत काढलेली आहे. ''ज्या महाराजांनी हे वक्तव्य केलं होतं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे, पोलीस कारवाई करीत आहेत'', असे सांगितल्यानंतर लोक तिथून निघून गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.