महाविकास आघाडीचे राज्यपालांना विधानसभा अध्यक्षपद निवडीसाठी पत्र

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेतली.
Bhagatsingh Koshyari
Bhagatsingh Koshyari Team eSakal
Updated on

उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) छगन भूजबळ (Chagan Bhujbal) आणि नाना पटोलेंनी (Nana Patole) आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. विधानसभेचं रिक्त असलेलं अध्यक्षपद आणि विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या मुद्यांवरून ही भेट झाली असून, यामध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. ते अध्यक्षपदावर नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. हिवाळी अधिवेशनात सरकारने अध्यक्ष निवडणुकीची तारीख द्यावी म्हणून विनंती केली. पुन्हा अर्थसंकलपीय अधिवेशनात अध्यक्ष पद निवडणूक घ्यावे याबाबत 23 फेब्रुवारी रोजी प्रस्ताव देण्यात आला. या प्रस्तावाला मंजुरी द्यावी यासाठीचं पत्र राज्यपालांना देण्यात आले.

Bhagatsingh Koshyari
अंबाबाई,जोतिबा मंदिरात लहानग्यांना प्रवेश; जाणून घ्या नवी नियमावली

मंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, बहुमत सरकार असताना बारा आमदार राज्यपालांनी न्याय द्यावा त्यांना वंचित ठेवू नये विनंती केली. राज्यपाल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, राज्यपाल जी तारीख देतील ती घेऊ असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. त्यानंतर छगन भुजबळ यांनी एक वर्ष हे पद रिकामं असल्याचं म्हणत याबाबत निर्णय घ्यावा असं म्हटलं आहे.

Bhagatsingh Koshyari
"राज्यातील शिक्षण व्यवस्थेसमोर असंख्य आव्हानं; शैक्षणिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.