Badlapur School Crime: बंद बेकायदेशीर! कुठलाच राजकीय पक्ष बंद ठेऊ शकत नाही, अन्यथा...'' कोर्टाचे निर्देश

Maharashtra bandh: मुंबई हायकोर्टात शुक्रवारी झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टाने असा बंद करता येणार नाही, असं म्हटलंय. उद्याचा बंद बेकायदेशीर असून कोणताही राजकीय पक्ष असा बंद करु शकत नाही, अन्यथा कारवाई होईल, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.
Mumbai High Court
Mumbai High Court Esakal
Updated on

Mumbai High Court: बदलापुरात एका शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेनंतर बदलापूरमध्ये मोठा उद्रेक बघायला मिळाला. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने शनिवारी बंद पुकारला आहे.

चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचार घटनेच्या निषेधार्थ 24 ऑगस्टला महाविकास आघाडीच्यावतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. यानिमित्ताने शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील लेकी बाळींसाठी हा बंद पुकारण्यात आला असून सर्वांना यात सहभागी होण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र बंद विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखली केली आहे. महाराष्ट्र बंद करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश द्या, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या याचिकेतून केली आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडी हा बंद पुकारत असल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय. बंद पूर्णपणे बेकायदेशीर असून कुणालाही महाराष्ट्र बंद पुकारण्याचा अधिकार नाही, असा दावाही या याचिकेतून करण्यात आलाय.

Mumbai High Court
SSC HSC Supplementary Exams: दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; असा पाहा निकाल

मुंबई हायकोर्टात शुक्रवारी झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टाने असा बंद करता येणार नाही, असं म्हटलंय. उद्याचा बंद बेकायदेशीर असून कोणताही राजकीय पक्ष असा बंद करु शकत नाही, अन्यथा कारवाई होईल, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

Mumbai High Court
Kolkata Case Hearing: कोलकाता हत्या प्रकरण; मुख्य आरोपी संजय रॉयला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत इतरांनी देखील महाराष्ट्र बंद विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. दुसरीकडे महाराष्ट्र बंद करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ यांनी कोर्टात बाजू मांडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.