MVA Seat Sharing: विधानसभेसाठी मविआची तयारी सुरु, जागा वाटपाबाबत मोठी अपडेट! वर्षा गायकवाडांनी थेट सांगितलं

लोकसभा निवडणुका उरकल्यानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांकडून सुरु झाली आहे.
varsha gaikwad
varsha gaikwadSakal

मुंबई : लोकसभा निवडणुका उरकल्यानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांकडून सुरु झाली आहे. लोकसभेत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाल्यानं त्यांचा उत्साह सध्या दुणावला आहे तर महायुतीचा मोठा पराभव झाल्यानं त्यांच्यापुढं मोठी आव्हानं आहेत. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या विधानसभेसाठीच्या जागा वाटपांची चर्चा लवकरच सुरु होणार आहे. खासदार वर्षा गायकवाड यांनी याचे संकेत दिले आहेत. (MVA seat sharing discussion for vidhan sabha election to begin soon MP Varsha Gaikwad told about it)

एएनआयशी बोलताना गायकवाड म्हणाल्या, "महाविकास आघाडी एकत्रितपणे आगामी विधानसभा निवडणुका लढवणार आहे. कारण आमची एकमेकांशी सातत्यानं याबाबत चर्चा सुरु आहे. यात मला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, एकदा अनिल परब यांची मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक उरकली की त्यानंतर आम्ही मुंबई आणि महाराष्ट्रातील जागांबाबत एकत्र बसून चर्चा करणार आहोत"

varsha gaikwad
Nilesh Lanke: गज्या मारणेच्या भेटीवर खासदार निलेश लंकेचं स्पष्टीकरण; म्हणाले 'माझं जाणं पुर्वनियोजित...'

सुनिल तटकरे यांनी या विधानसभा निवडणुकीत आम्ही २०० पार जाऊ असा दावा केला होता. यावरुन टोला लगावताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, ते एकटेच लढणार आहेत की कसं? जर महायुती म्हणून लढणार असतील तर महायुतीनंच म्हटलंय की, अजित पवारांमुळं ते हारले. त्यामुळं सुनील तटकरे खरं बोलताहेत की दुसरे खरं बोलताहेत? त्यामुळं ते कोणत्या बेसवर हे विधान करत आहेत त्यांच्यातच सध्या वाद सुरु आहेत.

varsha gaikwad
Rohit Pawar vs Jayant Patil: जयंत पाटलांना बॅकफुटवर ढकलण्याचं काम की दुसरं काही? सांगली-हातकणंगलेत खरंच विरोधात काम केलं का?

आम्हाला माहिती आहे की जनतेनं आमच्याबाजूनं कौल दिला आहे. कधीही जनतेला गृहित धरुन चालायचं नाही. जनतेच्या मताचा आदर केला पाहिजे, त्यांना विनंतीच्या भाषेतच बोलायला पाहिजे. तसंही जनतेला सर्वकाही कळतं. पण मला वाटतं की जनतेनं महाविकास आघाडीचं सरकार राज्यात पुन्हा आणावं. सुसंस्कृत महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम झालं पाहिजे. महाराष्ट्रात सध्या जे राजकारण सुरु आहे की एक पक्ष फोडा दुसरा पक्ष फोडा. तसंच ईडीच्या नोटीस द्या त्यानंतर लोकसभेची तिकीट वाटा आणि त्यांच्या केसेस बंद करा, हे लोकांना आवडत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com