MVA: मविआ अजूनही अभेद्य! पवार, ठाकरे अन् पटोले एकत्र करणार महाराष्ट्र दौरा

राष्ट्रवादीतील फुटीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीशी सामना करणासाठी महाविकास आघाडी सज्ज
MVA meeting
MVA meeting
Updated on

मुंबई : राष्ट्रवादीतील फुटीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीशी सामना करणासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. यासंदर्भात नुकतीच काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांची मुंबईत भेट घेतली. या भेटीत राष्ट्रवादीतील फुटीनंतरची रणनीती ठरवण्याबाबत चर्चा झाली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, नसीम खान यांची उपस्थिती होती. (MVA still intact Sharad Pawar Uddhav Thackeray Congress leaders together will do Maharashtra tour)

MVA meeting
Ajit Pawar: "परवानगीशिवाय माझा फोटो वापरु नयेत अन्यथा..."; शरद पवारांचा अजितदादा गटाला इशारा

या बैठकांनंतर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते मिळून महाराष्ट्र दौरा करणार असल्याचं निश्चित करण्यात आलं. या दौऱ्याला उत्तर महाराष्ट्रातून लवकरच सुरुवात होणार असून लोकशाहीविरोधी भाजपला राज्यातून उखडून टाकणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

MVA meeting
Ajit Pawar: पहिल्याच कॅबिनेटमध्ये मिठाचा खडा! शिंदेंच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर

दरम्यान, दुसरीकडं शिवसेनेच्या ठाकरे गटाचीही बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडी अभेद्य असल्याचं मान्य करण्यात आलं. शरद पवार एकटे नाहीत आम्ही त्यांच्यासोबत आहोत. ते मजबूत आहेत मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. शरद पवार हे बाळासाहेब ठाकरेंसारखेच आहेत ते कधीही स्वतःला एकटं समजणार नाहीत, असं शिवसेनेच्या बैठकीनंतर संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

MVA meeting
Sanjay Sirsath: "न्याय दिल्याशिवाय जमणार नाही"; अजितदादांच्या एन्ट्रीनंतर शिरसाटांचा थेट इशारा

त्यामुळं राष्ट्रवादीतील फुटीनंतर आता महाविकास आघाडीचं काय होणार? या प्रश्नांचा पूर्णविराम मिळाला आहे. पण आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मविआ काय नवी रणनिती आखणार याकडे सर्वांच्या नजरा असतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.