MVA : 'मविआ'तील मतभेद उघड? राष्ट्रवादी-शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांचीच पत्रकार परिषदेला दांडी

Ambadas Danve, Nana Patole, Jitendra Awhad
Ambadas Danve, Nana Patole, Jitendra Awhad
Updated on

मुंबई - राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघ आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे या जागा एक्सचेंज कऱण्यात आल्या. या गोंधळावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र या पत्रकार परिषदेला प्रमुख नेत्यांनी दांडी मारल्याचं दिसून आलं. (Mahavikas Aghadi news in Marathi )

Ambadas Danve, Nana Patole, Jitendra Awhad
MVA Press Conference: नाशिक नापूरच्या पाठिंब्याचा प्रश्न निकाली, पण...

महाविकास आघाडीकडून नाशिक पदवीधर निवडणुकीत शुभांगी पाटलांना तर नागपूर शिक्षक पदवीधर निवडणुकीसाठी सुधाकर आडबाले यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. याबाबत घोषणा करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून जितेंद्र आव्हाड आणि उद्धव ठाकरे गटाकडून विधान परिषद सभापती अंबादास दानवे उपस्थित होते.

Ambadas Danve, Nana Patole, Jitendra Awhad
Satyajeet Tambe : बंडखोर सत्यजीत तांबेंची काँग्रेसकडून हकालपट्टी

दरम्यान काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष असताना राष्ट्रवादीकडून देखील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उपस्थिती अपेक्षित होते. तर शिवसेनेकडून देखील ठाकरे कुटंबातील कोणीतरी अपेक्षित होते. मात्र शिवसेनेकडून अंबादास दानवेंना पाठविण्यात आलं. त्यामुळे महाविकास आघाडीत या निवडणुकीवरून मतभेत तर नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे.

तत्पूर्वी नागपूरमधील उमेदवाराला पाठिंबा जाहीर करण्यावरून काँग्रेसमध्ये मोठा गोंधळ झाला, तर नाशिकमध्ये तांबे कुटुंबाने काँग्रेसची गोची केली. त्यामुळे नाना पटोले यांनी भूमिका स्पष्ट करणे अनिवार्य झालं होतं. त्यानुसार पटोले यांनी भूमिका स्पष्ट करतानाच सत्यजीत तांबे यांच्यावर आजच कारवाई होणार असल्याचं स्पष्ट केलं. मात्र एकंदरीत घडलेल्या घडामोडींवरून भाजपने महाविकास आघाडीला हादरे दिले, स्पष्ट झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.