Maharashtra: ऐतिहासिक! 'ही' संस्था बाजारभावात खरेदी करणार शेतकऱ्यांचं धान्य, संस्थेकडून शेतकऱ्यांना 'हे' निर्देश

पीएसएफ योजनेअंतर्गत पणन महासंघाच्या संस्थेकडून खरेदी करण्यासाठी नागपूर जिल्ह्यात पाच खरेदी केंद्रांना परवानगी मिळाली आहे.
Maharashtra: ऐतिहासिक! 'ही' संस्था बाजारभावात खरेदी करणार शेतकऱ्यांचं धान्य, संस्थेकडून शेतकऱ्यांना 'हे' निर्देश
Updated on

NAFED Nagpur News: नाफेडतर्फे पीएसएफ योजनेअंतर्गत पणन महासंघाच्या संस्थेकडून खरेदी करण्यासाठी नागपूर जिल्ह्यात पाच खरेदी केंद्रांना परवानगी मिळाली आहे. विशेष म्हणजे शासन यंदा प्रथमच हमी भावात नव्हे तर बाजार भावात तूर खरेदी करणार आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. नाफेड अंतर्गत तूर खरेदीसाठी जिल्ह्यातील काटोल, नरखेड, उमरेड, कुही आणि भिवापूर या केंद्रांना परवानगी दिली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना नावे नोंदणी करण्याबाबत निर्देश दिले आहेत.


खरीप पिकांतील भरडधान्याचा बाजारभाव हमीभावापेक्षा जास्त असल्याने ज्वारी, मका आणि बाजरीच्या शासकीय खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली होती. म्हणून शासनाने आता खरीप कडधान्य हमीभावापेक्षा बाजारभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना लाभ होईल व व्यापाऱ्यांमध्ये चुरस निर्माण होईल.

तुरीचा हमीभाव शासनाने ७००० रुपये प्रति क्विंटल जाहीर केला आहे. बाजारात मात्र, तूर ८००० रुपयांपेक्षा अधिक दर खरेदी केली जात आहे. शेतकऱ्यांची खरेदीसाठी नोंद झाली असेल तर त्याने इतर कागदपत्रे देण्याऐवजी फक्त पीकपेरा असलेला ७-१२ उतारा जोडावा लागणार आहे. नवीन शेतकऱ्यांना मात्र, आधार कार्ड , बॅंक खाते आणि ऑनलाइन पिकपेरा असलेल्या ७-१२ उतारा जोडणे आवश्यक राहणार आहे.


यावर्षी नाफेड दररोज बाजारभाव सकाळी खरेदी केंद्रांना कळविणार आहे. त्याच दराने तूर खरेदी केली जाणार असल्याचे महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन नागपूर कार्यालयाचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी आर.व्ही. तराळे यांनी कळवले आहे. (Latest Marathi News)

Maharashtra: ऐतिहासिक! 'ही' संस्था बाजारभावात खरेदी करणार शेतकऱ्यांचं धान्य, संस्थेकडून शेतकऱ्यांना 'हे' निर्देश
Shikhar Dhawan : शिखर धवनला सहन होईना लेकराचा विरह...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.