Nagpur:धक्कादायक ! उघडे चेंबर उठले पादचाऱ्यांच्या जीवावर, नागपुरात एका वर्षात ९५ पादचाऱ्यांना गमवावे लागले प्राण

फूटपाथखालील ड्रेनेज लाईनवरील उघडे चेंबर पादचाऱ्यांच्या जीवावर उठले. धक्कादायक बाब म्हणजे २०२२ मध्ये फुटपाथवर चालणाऱ्या एकूण ९५ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला.
Nagpur:धक्कादायक ! उघडे चेंबर उठले पादचाऱ्यांच्या जीवावर, नागपुरात एका वर्षात ९५ पादचाऱ्यांना गमवावे लागले प्राण
Updated on

Nagpur City :शहरात सिमेंट रस्त्यांसोबत फूटपाथही बांधण्यात आले होते. परंतु अनेक फूटपाथ अतिक्रमणधारकांच्या कवेत गेले. काही फूटपाथवर विद्युत डीपी उभ्या राहिल्या. काही ठिकाणी फूटपाथखालील ड्रेनेज लाईनवरील उघडे चेंबर पादचाऱ्यांच्या जीवावर उठले. धक्कादायक बाब म्हणजे २०२२ मध्ये फूटपाथवर चालणाऱ्या एकूण ९५ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला.

रस्ते अपघातांवरील ‘भारतातील रस्ते अपघात-२०२२’ या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अभ्यासातून २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये नागपूर शहरात ११ टक्क्यांनी अपघात वाढल्याचे पुढे आले. २०२१ मध्ये नागपुरातील रस्त्यांवर ९५८ अपघात झाले असून यात २६८ मृत्यू झाले. तर २०२२ मध्ये १ हजार ८० अपघात झाले. यात ३१० लोकांचा मृत्यू झाला.

विशेष म्‍हणजे या अपघातांपैकी १ हजार ४८ अपघात सरळ रस्त्यांवर झाले असून यात २९१ लोकांचा मृत्यू झाला. यात फूटपाथवर चालणाऱ्या ९५ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील फूटपाथ पादचाऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरत असल्याचे चित्र आहे. महापालिकेकडून फूटपाथवरील अतिक्रमण हटविले जात असले तरी त्यात गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. फूटपाथवरील अतिक्रमणविरोधी कारवाई केवळ फार्स ठरत आहे.

वर्षभरात ९५ पादचाऱ्यांचा बळी

शहरातील अनेक फूटपाथवर दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. अनेक ठिकाणी ट्युशन क्लासेस संचालकांनी त्यावर पार्किंग उभी केली आहे. याशिवाय अनेक हॉटेल्सनेही हीच री ओढली आहे. महाल येथील चिटणीस पार्क येथे अनेक कार्यक्रम होतात. परंतु येथे पार्किंगची व्यवस्था नसल्याने फूटपाथवरच पार्किंग केली जात आहे. भरीस भर या चौकातून अग्रसेन चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर जुन्या दुचाकी विक्रीची दुकाने असून सर्व दुचाकी फूटपाथवर उभ्या केल्या जातात. अशीच स्थिती सर्वत्र असल्याने पादचाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे.

दुचाकीधारकांची संख्या अधिक

शहरातील रस्त्यांवर इतर वाहनांच्या तुलनेत दुचाकीस्वार अधिक अपघाताला बळी पडत आहे. दुचाकीने ६४१ अपघात झाले असून यात १७४ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. चारचाकी वाहनांच्या ७१ अपघातांत २१ जणांचा मृत्यू झाला.(Latest Marathi News)

Nagpur:धक्कादायक ! उघडे चेंबर उठले पादचाऱ्यांच्या जीवावर, नागपुरात एका वर्षात ९५ पादचाऱ्यांना गमवावे लागले प्राण
Hardik Pandya : वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का! उपकर्णधार स्पर्धेतून बाहेर, 'या' खेळाडूची संघात एन्ट्री

उड्डाणपुलावर २८ अपघातात १६ मृत्यू

शहरात अनेक उड्डाणपूल तयार झाले. वाहतूक कोंडी सुटली असली तरी यावरून जाताना होणारे अपघात चिंतेचा विषय ठरत आहे. मागील वर्षी २०२२ मध्ये उड्डाणपुलावर २८ अपघात झाले असून यात १६ जणांना जीव गमवावा लागला.

वेगाने घेतले ३१ बळी

वेगाने वाहने चालविणे हल्ली तरुणाईची फॅशन झाली आहे. मागील वर्षी ३१ जणांना वेगाने वाहने चालविल्याने जीव गमवावा लागला. मागील वर्षी वेगवान गतीमुळे ६७ अपघात झाले. (Latest Marathi News)

Nagpur:धक्कादायक ! उघडे चेंबर उठले पादचाऱ्यांच्या जीवावर, नागपुरात एका वर्षात ९५ पादचाऱ्यांना गमवावे लागले प्राण
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी तरुणांची आत्महत्या, सरकारकडून १० लाखांची मदत; पण, दिलेले चेक झाले बाउन्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.