Sanjay Raut : नागपूर शहर चार तासात बुडालं, हाच तुमचा विकास का? संजय राऊतांचा सवाल

Sanjay Raut on Devendra Fadnavis
Sanjay Raut on Devendra Fadnavis google
Updated on

नागपूर - Nagpur Floods: नागपूर मध्ये 22 सप्टेंबरच्या रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे नागपूर शहर पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे. कित्येक गुरं पुरात वाहुन गेली आहे. कित्येक नागरिकांच्या गाड्या वाहून गेल्या. तर अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. या पुरात तीन मृत्यू झाले. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.

Sanjay Raut on Devendra Fadnavis
Ajit Pawar : अमित शहांच्या ऑफीसमधून निरोप आल्यानंतरच मी...; गैरहजेरीवर अजितदादांचं स्पष्टीकरण

संजय राऊत म्हणाले की, नागपूरला आलेला पूर आणि प्रलय नैसर्गिक आपत्ती आहेच. अनेकांची घरे, बंगले पाण्यात गेली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःला नागपूरचे सुपुत्र मानतात. नागपुरात हाहाकार सुरु होता, तेव्हा ते देशाच्या गृहमंत्र्यांबरोबर गणपतीचे दर्शन घेण्यात व्यस्त होते.

Sanjay Raut on Devendra Fadnavis
Honey Bee Attack: अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांवर मधमाशांचा हल्ला, 200 जण जखमी

फडणवीस यांच्यावर जेव्हा टीका झाली, तेव्हा ते नागपूरकडे रवाना झालेत. मुंबई सांभाळता येत नाही, असं आम्हाला म्हंटलं जात होत. मात्र, आम्ही ती उत्तमरित्त्या सांभाळली. तसेच देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना काल ढकललं जात होतं, हे दुर्दैवी चित्र काल महाराष्ट्राने पाहिल्याची टीका राऊत यांनी केली.

दरम्यान तासांच्या पावसात नागपूर बुडालं. कुठे आहे विकास? कुठे होते नागपूरचे सुपुत्र? नैसर्गिक आपत्ती जरी असली तरी त्यानंतरच्या उपाययोजना करण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. फडणवीस शिवसेना आणि मुंबईवर टीका करतात. मात्र, आता त्यांना अधिकार आहे का? ते पळून गेले, असंही राऊत यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.