Nagpur Crime News: नागपूर पुन्हा हादरलं! सेन्ट्रल जेलमध्ये गतीमंद कैद्यावर लैंगिक अत्याचार अन् मारहाण

न्यायालयाने आरोपीची वैद्यकीय चाचणीकरिता आज दुपारपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश धंतोली पोलिसांना दिले आहेत
Nagpur Crime News
Nagpur Crime NewsEsakal
Updated on

लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदांतर्गत (पोक्सो) न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या आरोपीवर नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात अनैसर्गिक अत्याचार झाल्याचा दावा आरोपीतर्फे न्यायालयीन सुनावणी दरम्यान करण्यात आला आहे. आरोपातील गंभीरता लक्षात घेता विशेष पोक्सो न्यायालयाने आरोपीची वैद्यकीय चाचणीकरिता आज (ता. ३) दुपारपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश धंतोली पोलिसांना दिले आहेत.

या प्रकरणी न्यायाधीश ओ. पी. जयस्वाल यांनी निर्णय दिला. पीडित २९ वर्षीय आरोपीवर २०१६ मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणात विनयभंग, पोक्सो, आर्म ॲक्ट अशा विविध कायद्यांतर्गत नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याच प्रकरणात जामिनावर आज न्यायालयात सुनावणी सुरू असताना आरोपीने अर्ज सादर केला.

Nagpur Crime News
Beed Crime : बीडमध्ये महिलेचा विनयभंग; हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल, ग्रामस्थांनी दिला चोप

या अर्जानुसार, पीडित आरोपीला आई-वडील नाही. घरी केवळ दोन बहिणी असतात. त्यामुळे, जामिनावर मुक्तता करण्याची विनंती आरोपीने न्यायालयाला केली आहे. याच दरम्यान त्याने न्यायालयातील आपबिती कथन केली. पीडित गतिमंद असल्याने कारागृहातील रुग्णालयात तो उपचारासाठी गेला होता.

अत्याचार करणारा आरोपी त्याला औषधे देत असे. याच संधीचा फायदा घेत त्याने तोंड दाबून आपल्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे पीडित आरोपीने सुनावणी दरम्यान सांगितले आहे.

न्यायालयाने कारागृह प्रशासनाचे सहकार्य घेत धंतोली पोलिसांना प्रकरणाची शहानिशा करण्याचे आदेश दिले. तसेच, वैद्यकीय अहवाल सादर करा, असेही नमूद केले आहे. पुढील सुनावणी आज दुपारी निश्‍चित केली आहे.

Nagpur Crime News
Mumbai Crime: धक्कादायक! दोन दिवसाच्या नवजात बाळाला रिक्षात सोडलं अन् अपहरणाचा केला बनाव कारण..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()