Nagpur Flood Relief Funds:नागपुरमध्ये शुक्रवारी (दि. २२ सप्टेंबरला) मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे शहरात पूरसदृष्य परिस्थिती उद्भवली. त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर आलेल्या भागाची पाहणी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील नागपूर महापालिकेच्या बैठकीतून या परिस्थितीचा आढावा घेतला.
यानंतर घोषणा करण्यात आली की पूरग्रस्तांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली तर ज्या लोकांच्या दुकानाचं नुकसान अशांना ५० हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे. तर पूरामुळे आलेला गाळ काढण्यासाठी राज्य सरकार निधी देणार असल्याची घोषणी उपमुख्यमंत्र्यांनी केली.
नागपुरमधील या पूरामुळे अद्याप तिघांचा मृत्यू झालाय. तसेचं नागपुर शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी , महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी देखील उपस्थिती होते.
अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडल्यानंतर माध्यमांशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. यावेळी फडणवीस म्हणाले की, "अवघ्या 4 तासात झालेल्या मुसळधार पावसाने आणि त्यातही केवळ 2 तासात 90 मि.मी. पाऊस झाल्याने अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आणि नागनदी, पिवळी नदी लगतचा परिसरात पाणी शिरले. यामुळे रस्ते, पुलांची क्षती झाली. नाल्याजवळच्या भींती पडल्या, घरात पाणी शिरले, त्यामुळे नागरिकांचे नुकसान झाले. सुमारे 10 हजार घरांमध्ये पाणी शिरल्याचा प्रारंभिक अंदाज आहे. त्यांना तातडीची मदत 10 हजार रूपये देण्यात येईल. गाळ काढण्यासाठी राज्य सरकार निधी देईल. (Latest Marathi News)
ज्यांच्या दुकानांची क्षती झाली, त्यांना 50 हजार रुपयांपर्यंत मदत देणार. टपरी व्यवसायिकांना नुकसानीसाठी 10 हजारापर्यंत मदत देण्यात येईल. शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याने सर्व टीमची तैनाती कायम ठेवण्यात आली आहे. पोलिस विभाग सुद्धा सज्ज आहे."
यापुढे फडणवीस म्हणाले की,"आज या स्थितीनंतर वीज बंद करण्यात आली होती, ती बहुतेक ठिकाणी पुन्हा सुरु करण्यात आली आहे. 14 ट्रान्सफॉर्मर अजून सुरु केलेले नाहीत कारण, तेथे पाणी कमी होण्याची वाट पाहिली जात आहे. तेथे ओलावा कायम आहे. कुठलाही अनर्थ होऊ नये, म्हणून वीज बंद आहे.
सकाळपर्यंत ती सुरु करण्यात येईल, अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पहिल्या तीन तासातच लोकांना बाहेर काढण्याचे काम प्रशासनाने केले. एनडीआरएफ, एसडीआरएफचा यात मोठा वाटा आहे. रिस्पॉन्स टाईम हा चांगला होता आणि त्याचे कौतूक केले पाहिजे." (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.