हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याला दोन दिवसाच्या सुट्टीनंतर आजपासून (ता.११) सुरुवात होत आहे. या आठवड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान तसेच मराठा आरक्षण या प्रश्नावर वादळी चर्चा अपेक्षित आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक असा सामना पहायला मिळणार आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला गुरुवारी (ता.७) सुरुवात झाली. (Latest Marathi News)
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या, तर दुसऱ्या दिवशी विधानसभेत विरोधी पक्षाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दिवसभरासाठी कामकाजावर बहिष्कार टाकला. राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक यांची विधानसभा सभागृहातील उपस्थिती दोन दिवस चर्चेचा विषय ठरली. (Marathi Tajya Batmya)
या उपस्थितीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून मलिक यांना विरोध केला. तसेच शिंदे गटानेही मलिक यांच्या उपस्थितीवर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली, फडणवीस यांच्या विरोधामुळे अजित पवार गटावर वेगळीच नामुष्की ओढवली आहे. त्यामुळे या आठवडयातील कामकाजात नवाब मलिक कुठे असणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.(Latest Marathi News)
दोन्ही सभागृहांच्या असुधारित कार्यक्रम पत्रिका उपलब्ध झाल्या आहेत. त्यानुसार सोमवारी विधानसभेत विरोधी पक्षांच्यावतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नियम १०१ अन्वये चर्चा दाखविण्यात आली आहे. विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शेतकऱ्यांच्या समस्यांवर अल्पकालीन चर्चा करणार आहेत. विधानसभेतील चर्चा दोन ते तीन दिवस चालण्याची शक्यता असून त्याला राज्य सरकारच्या वतीने उत्तर देताना शेतकऱ्यांना मदतीच्या महत्वाच्या घोषणा अपेक्षित आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.