मंत्रिपदाचं आमिष दाखवून आमदारांची फसवणूक प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नीरज सिंह राठोड यांने तब्बल 28 आमदारांची फसवणूक केल्याची माहिती नागपूर पोलीस दलातून मिळाली आहे. ( Nagpur News Jp Nadda Fake Pa Neeraj Singh Rathore Mobile Numbers Of 28 MLAs In CDR )
मिळालेल्या माहितीनुसार, नीरज सिंहच्या सीडीआरमध्ये 28 आमदारांचे फोन नंबर आढळून आले असून त्यातील तीन आमदारांनी ऑनलाईन पैसे पाठवल्याचंही तपासात समोर आले आहे. महाराष्ट्र, गोवा आणि नागालँडसह पश्चिम बंगाल व झारखंड या राज्यातील काही आमदारांचे मोबाईल क्रमांक मिळाले आहेत.
नीरज सिंह स्वतःला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा स्वीय सहाय्यक सांगत असे. महाराष्ट्रातील भाजप आमदारांना तुम्हाला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद देण्याचे ठरले आहे असे सांगायचा. एवढचं नाही तर तुम्हाला कोणता मंत्रिपद हवा आहे याची विचारणा देखील करायचा.
भाजप आमदार विकास कुंभारे यांना 7 मे पासून काही दिवस सतत नीरज सिंह राठोड याचे फोन येत होते. सुरुवातीला विकास कुंभारे यांचा आपल्याला खरंच राष्ट्रीय अध्यक्षांच्या कार्यालयातून फोन येत आहे असंच वाटलं.
मात्र नंतर मंत्रिपदाच्या मोबदल्यात पैशाची मागणी होऊ लागल्यामुळे विकास कुंभारे यांना शंका आली. त्यांनी चौकशी केली असता हा त्यांना लुबाडण्याचा प्रकार असल्याचे लक्षात आलं.
त्यानंतर कुंभारे यांनी नागपूर पोलिसांकडे रीतसर तक्रार दिली फेब्रुवारी महिन्यात नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदारसंघाचे भाजप आमदार टेकचंद सावरकर यांच्यासोबत ही घडले होते. त्यांना एका गरीब भाजप नेत्याला मदत करण्याच्या नावाखाली मंत्रिपदाच्या मोबदल्यात पैशाची मागणी करण्यात आली होती.
एक नव्हे तर अनेक आमदारांची अशाच पद्धतीने फसवणूक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे नागपूर पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर नागपूर पोलिसांनी नीरज सिंह राठोडचा फोन सर्विलंन्स वर ठेवला. तो गुजरातमधील मोरबी मध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि नागपूर पोलिसांच्या पथकाने काल संध्याकाळी त्याला मोरबी मधून ताब्यात घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.