Nagpur Vidhan Bhavan History : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. तब्बल दोन वर्षानंतर यंदा नागपुरात हिवाळी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात राज्याचे दोन्ही सभागृह, विधानसभा आणि विधान परिषद समाविष्ट आहेत,.नागपूरमध्ये दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर-जानेवारीमध्ये आयोजित केली जातात. नागपूर येथील विधानभवन देखील प्रचंड देखणे आहे. आज आपण त्याचा इतिहास जाणून घेऊ.
नागपुरातील अनेक देखण्या पुरातन वास्तुपैकी एक असलेली, इंग्रजी 'ई' या मुळाक्षराच्या आकारातील सोनेरी सैन्ड स्टोन, लाल रंगाच्या बिटा आणि चुन्याच्या वापरातून निर्माण झालेली विधानभवनाची डोलदार दुमजली जुनी इमारत पूर्वी कॉन्सिल हॉल म्हणून ओळखली जात होती.
या वास्तुच्या बांधकामाचा पायाभरणी शुभारंभ चार्लेस बॅरॉन हार्डिंग्ज ऑफ पेन्सहर्स्ट, व्हाईसराय अँन्ड गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया यांचे शुभहस्ते मंगळवार, दिनांक १७ डिसेंबर, १९९१२ रोजी झाला. इमारतीचे डिझाइन तेव्हांचे प्रसिद्ध वास्तुशिल्पकार - थॉमस मॉन्टेक्यू यांनी तयार केले होते. मॉन्टेक्यू यांनीच तयार केलेल्या भारत सरकारच्या दिल्लीतील टेम्पररी कॉन्सिल चेम्बरच्या इमारतीवर ते आधारीत होते.
१९१६-१७ मध्ये या इमारतीसाठी तेव्हा ५.५० एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली होती (सध्या विधान भवन ८.८६ एकर एवढ्या क्षेत्रावर आहे) व यासाठी रुपये ३३,३५० इतकी रक्कम अदा करण्यात आली. विधान भवन इमारतीचे बांधकाम सुरू होते त्याच वेळी थॉमस यांनीच डिझाईन केलेल्या जीपीओ, पोस्ट अॅण्ड टेलिग्राफ आणि कृषी प्रयोगशाळा या इमारतींचे सुद्धा बांधकाम सुरू होते. विधान भवन ही इमारत १९१९ मध्ये बांधून पूर्ण करण्यात आली व यासाठी त्यावेळी एकूण रुपये ५,४७,५०८ इतका खर्च आला.
नागपूर येथील कौन्सिल हॉल इमारतीमध्ये तत्कालीन मध्यप्रदेश राज्याच्या विधानसभेची अधिवेशने भरत असत. नागपूरातील उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ०६ जानेवारी, १९३६ रोजी याच इमारतीत झाला होता तर ३० जुलै, १९३७ मध्ये काँग्रेसचे तत्कालीन नेते डॉ एन. बी. खरे यांच्या शपथविधी सोहळ्याची साक्षीदारसुद्धा ही इमारत आहे. महाराष्ट्र विधानसभेचे पहिले नागपूर अधिवेशन दिनांक १० नोव्हेंबर ते १६ डिसेंबर, १९६० या कालावधीत येथे संपन्न झाले होते.
केवळ १२० सदस्य बसण्याची क्षमता असलेले नागपूर येथील पूर्वीचे विधानसभा सभागृह व तात्पुरती बसण्याची सोय असलेले विधानपरिषद सभागृह यामुळे सदस्यांना अडचणी, असुविधा व गैरसोईंना तोंड द्याव लागले तरीही, १९६० सालापासून केवळ १९६२-६३ सालचा अपवाद वगळता (चीन व पाकिस्तान यांनी देशावर आक्रमण केल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती) सातत्याने नागपूर येथे प्रतिवर्षी हिवाळी अधिवेशन घेतले जात आहे.
१९९३ मध्ये नागपूर येथील विधान भवनाच्या विस्तारीत इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. ११ डिसेंबर, १९९३ रोजी तत्कालीन दिवंगत राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते या विस्तारीत इमारतीतील नवीन सभागृहाचे उद्घाटन झाले व तेथे विधानसभेच्या बैठका भरू लागल्या व पूर्वीच्या विधानसभा सभागृहात विधानपरिषदेच्या बैठका घेण्यात येऊ लागल्या
नागपूरमध्ये सदस्यांच्या निवासाकरिता बांधलेल्या प्रशस्त आमदार निवासामुळे सदस्यांची व त्याचबरोबर अन्य अभ्यागतांचीही सोय होऊ शकते राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेमार्फत राज्यातील विद्यापीठांच्या राज्यशास्त्र व लोकप्रशासन या विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्याकरिता अभ्यासवर्ग दरवर्षी नागपूर येथील हिवाळी अधिवेशन कालावधीत घेतला जातो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.