"..तेव्हापासुन कोणावरही टीका करण्याचं टाळतो"

राज्यात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांवर नाना पाटेकर यांनी प्रतिक्रिया दिली.
Nana Patole
Nana Patoleटिम ई सकाळ
Updated on

सध्या राज्यात आरोप प्रत्यारोपांवरून राजकारण चांगलच तापलय. यावरून नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी प्रतिक्रिया दिली. शिवजयंतीच्या निमित्ताने पुण्यातील बाणेर (Baner) येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं नाना पाटेकर यांनी लोकार्पण केले. त्यावेळी बोलत होते.

राज्यात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांबाबत विचारलेल्या प्रश्नांवर माध्यमांशी बोलताना नाना पाटेकर म्हणाले, “नाम संस्थेच्या (Naam foundation) माध्यमातून काम करताना माझी भूमिका सर्वांप्रती चांगली असली पाहिजे. मला सर्व पक्षांची गरज असते. मी उगाच भाष्य करणार नाही. मी कोणाला सांगणार नाही. कोणाला सांगण्याची माझी पात्रता नाही आणि मी सांगूही इच्छित नाही. प्रत्येकजण सुजाण आहे. आपल्या मतीप्रमाणे कसं वागायचं ते ठरवावं आणि त्याप्रमाणे ते वागत आहेत. नाम संस्थेची स्थापना झाली तेव्हापासुन कोणावरही टीका करण्याचं मी टाळतो.”

Nana Patole
आठवले म्हणाले, चंद्रशेखर राव यांना सगळ्यांना भेटण्याचा अधिकार; पण...

या कार्यक्रमाला भाजपा नेते गिरीश बापट (Girish Bapat), प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील (Chandrakant Patil), महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) इत्यादी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.