Toll Waiver: लोकांना मूर्ख बनवण्याचा हा निवडणूक 'जुमला', गांर्भियाने घेऊ नका, टोलमाफीवर कॉंग्रेस नेते नेमकं काय म्हणाले?

Mumbai Toll Waiver: मुंबईतील पाच टोलनाक्यांवर टोलमाफी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यावर कॉंग्रेस नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Mumbai Toll Waiver
Mumbai Toll WaiverESakal
Updated on

Mumbai Toll Waiver: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील टोलनाक्यांवर कोणताही कर लागणार नाही. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाच टोलनाक्यांवरील सर्व लहान चारचाकी वाहनांना टोल टॅक्स माफ करण्यात आला आहे. आज रात्री 12 वाजल्यापासून याची अंमलबजावणी होणार आहे. यावर आता सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. यावर कॉंग्रेस नेत्यांनी हे फक्त निवडणुकीसाठी केले असल्याचा आरोप केलेा आहे.

यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, हा निवडणूक 'जुमला' आहे. याकडे गांभीर्याने घेऊ नका. महायुती सरकारला त्यांची हार समोर दिसत आहे. यामुळे आता ते असे निर्णय घेत आहेत. तसेच नाना पटोले यांनी आज अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. यावर ते म्हणाले, आजच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाली. लवकरच आम्ही राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करू. आजच्या बैठकीत जागावाटपावर कोणताही चर्चा झाली नाही. महाविकास आघाडी सर्व 288 जागांवर निवडणूक लढवणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

तर दुसरीकडे यावर विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, लोकांना मूर्ख बनवण्याची हा निवडणूक 'जुमला' आहे. यातून सुमारे 800 कोटी रुपये कोणाच्या तरी फायद्यासाठी दिले जातील, यामागे हे राजकारण आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

Mumbai Toll Waiver
Mumbai Toll Waiver: मुंबईकर 'टोल'मुक्त! शहरातील पाचही टोल नाक्यांवर 'या' वाहनांना आता भरावा लागणार नाही शुल्क

दरम्यान या 5 टोलनाक्यांची नावे अद्याप अधिकृतपणे उघड करण्यात आलेली नाहीत. परंतु मुलुंड, वाशी, दहिसर, आनंद नगर आणि ऐरोली... हे 5 टोल नाके मोफत करण्यात आले आहेत. या टोलमधून दररोज लाखो वाहने मुंबईत प्रवेश करतात आणि बाहेर पडतात. अशा परिस्थितीत केवळ मुंबईतील लोकांनाच नाही तर इतर राज्यातून आणि बाहेरून शहरात येणाऱ्या लोकांनाही याचा फायदा होणार आहे. आज रात्री 12 वाजल्यानंतर मुंबईत येणाऱ्या कार आणि टॅक्सींना टोल टॅक्समधून दिलासा मिळणार आहे. चारचाकी हलक्या वाहनांना ही सूट देण्यात आली आहे. कार, ​​टॅक्सी, जीप, व्हॅन, छोटे ट्रक, डिलिव्हरी व्हॅन ही वाहने हलक्या वाहनांच्या श्रेणीत येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.