महाराष्ट्राचा कारभार गुजरातच्या इशाऱ्यावर केला जात असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला आहे.
अकोला : राज्यातील शेतकरी वाऱ्यावर सोडला आहे. पिकांची नुकसान होऊनही त्यांना मदत नाही. येथील रस्त्यांचा विकास ठप्प आहे. राज्यातील मालमत्ता गुजरातमध्ये (Gujarat) नेली जात आहे. महाराष्ट्राला अधोगतीला नेण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्राचा (Maharashtra) कारभार गुजरातच्या इशाऱ्यावर केला जात असल्याचा आरोप काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला. यावेळी पटोलेंनी प्रकाश आंबेडकरांच्या आघाडी प्रस्तावाबाबतही मोठं विधान केलं.
अकोला जिल्ह्यात ‘भारत जोडो’ यात्रेच्या (Bharat Jodo Yatra) तयारीच्या निमित्ताने गेले दोन दिवसांपासून मुक्काम ठोकून असलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आज बुधवारी सकाळी शासकीय विश्रामगृह इथं पत्रकार परिषदेत भाजप व राज्यातील सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. दिल्ली दरबारातील हस्तक असल्याचे जाहीरपणे सांगून महाराष्ट्राचा अवमान केला जतात आहे. राज्यातील मालमत्ता गुजरातला नेण्याचे मनसुबे आखले जात आहे. जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर करताना ते ‘स्पायडर मॅन’ असल्यासारखे वाटले आहे. कसा विकास होणार? अकोला जिल्ह्यातील रस्त्यांची कामे सहा वर्षांपासून रखडली आहेत. अकोलाला जाताना रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे समजले नाही. हीच परिस्थिती राज्यभरातील आहे. येथील नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.
पटोले पुढं म्हणाले, सर्व कारभार गुजरातच्या इशाऱ्यावर चालविला जात असल्याने येथील विकास ठप्प झाला असल्याचा आरोपी नाना पटोले यांनी केला. या पत्रकार परिषदेला काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, प्रदेश प्रवक्ते डॉ.सुधार ढोणे, श्याम उमाळकर, जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, महानगराध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे, माजी आमदार बबनराव चौधरी, मदन भरगड, साजिद खान पाठण, डॉ. झिशान हुसेन, कपिल ढोके, जि.प. सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’चा भाजपनं धसका घेतला आहे. त्यामुळं काँग्रेसमध्ये अस्वस्था असल्याची माहिती पेरली जात आहे. ही भाजपची अस्वस्थता असून काँग्रेस एकसंघ असल्याचे नाना पटोले म्हणाले.
राज्यातील सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयानं आधी दिलेले निर्णय व आता घेतलेले निर्णय हे न्याय व्यवस्थेवर संभ्रम निर्णाम करणारे असून, हे लोकशाहीसाठी सर्वाधिक घातक असल्याचे नाना पटोले म्हणाले.
राज्यात काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आला नाही. प्रस्ताव आल्यानंतर योग्य ते पावले उचलले जातील, असे नाना पटोले यांनी सांगितले. विधान परिषदेच्या अमरावती विभागीय पदविधर मतदारसंघ हा काँग्रेसच्या कोट्यात असून, उमेदवार लवकरच जाहीर केला जाईल, असे नाना म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.