Jalna Lathi Charge : 'पोलीसांचा दोष नाही, सरकारच...'; जालन्यातील लाठीमार प्रकरणी नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य

Nana Patole
Nana Patole Esakal
Updated on

जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार झाल्याचे घटनेचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमिवर राजकीय वातावरण देखील तापलं आहे. यादरम्यान लाठीमार प्रकरणात जालन्याचे पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. यादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

तसेत काँग्रेसकडून आजपासून जनसंवाद यात्रा काढली जाणार असल्याबद्दल देखील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माहिती दिली.

नाना पटोले म्हणाले की, लोकशाही वाचली पाहिजे, सगळ्या जातीधर्माचे लोक सुखाने राहिले पाहिजे यासाठी व्यवस्था निर्माण करणं काँग्रेसचं काम आहे. यासाठी आजपासून आम्ही यात्रेला निघालो आहोत. लोकसभेला खूप वेळ आहे त्यामुळे आठ-नऊ महिने आधी लोकसभेची तयारी करतोय असे म्हणाता येणार नाही असेही पटोले यांनी स्पष्ट केलं. देशात हुकुमशाही प्रवृत्ती तयारी झाली आहे, या हुकुमशाहीच्या भयापासून जनतेला मुक्त करण्यासाठी, त्यांना हिंमत देणं हा या यात्रेचा उद्देश आहे, असेही पटोले यांनी यावेळी सांगितलं.

महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या वाढत चालल्या आहेत, लोकांचं जगणं मुश्किल झालं आहे. तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे आणि भाजपने जगण्याचा अधिकार देखील हिरावून घेतला आहे, तुम्हा आत्महत्या करू नका तुम्हाला आम्ही न्याय देऊ हे सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे असे नाना पटोले म्हणाले. यात्रा आष्टी पासून सुरू होईल आणि ही यात्रा आज २२ किलोमीटर चालेल. दररोज सकाळी सात वाजता ही यात्रा सुरू होईल असेही नाना पटोले यांनी सांगितलं.

Nana Patole
India Alliance : आघाडीत बिघाडी? 'इंडिया'तील जागावाटपावरून ममता बॅनर्जी नाराज? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

पटोले पुढे म्हणाले की, जनसंवाद यात्रा झाल्यानंतर जालन्याला जाणार आहे, हा वनवा खोटारड्या भाजपने विशेषतः २०१४ मधील फडणीस सरकार खोटं आश्वासन देऊन सत्तेत आले. धनगर, मराठा समाजाला आरक्षणाचं गाजर दाखवण्यात आलं होतं. मोदी सरकारला कोणाचंही भलं करायचं नाही, आरक्षण संपवायचं आहे. नवीन पर्याय काढला जातोय खी ओबीसीचं आरक्षण मराठा समाजाला द्यायचं, म्हणजे महाराष्ट्रत ओबीसी-मराठा युद्ध निर्माण करायचं पाप हे करत आहेत. यामुळे आपआपसात समाजात भांडण निर्माण करून सत्ता मिळवण्याचे प्रयत्न हे करत आहेत. यांच्या खोट्या मानसिकतेत कोणी फसू नका तुम्हाला न्याय काँग्रेसच देऊ शकतो असेही नाना पटोले म्हणाले.

Nana Patole
Jalna Violence : शब्द न पाळल्याने आंदोलन चिघळले; शरद पवार यांचा आरोप, न्यायालयीन चौकशीची मागणी

सरकारच दोषी..

जालन्यात पोलीस अधिक्षकांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली जात आहे, यावर बोलताना पटोले म्हणाले की, खरंतर पोलीस अधिक्षकांचा दोष काय? सरकारने सौम्य लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला, तर सरकारच दोषी आहे. सरकारच्या आदेशाचं पोलिसांनी पालन केलं. त्यामुळे पोलीस विभाग दोषी नाही, सरकार दोषी आहे. सरकारवरच कारवाई व्हावी, सरकारने पायउतार व्हावं अन्यथा जनता त्यांना खाली ओढेल असेही नाना पटोले म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.