Nana Patole: पटोलेंच्या अपघातानंतर काँग्रेस आक्रमक, निवडणूक आयुक्तांना पत्र लिहित केल्या 'या' मागण्या

Election Commission: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे इतर महत्त्वाचे नेते बाळासाहेब थोरात, विजय वेडट्टीवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांची सुरक्षा वाढवण्याचे निर्देश द्यावेत," असे लोंढे यांनी पत्राच्या शेवटी म्हटले आहे.
Nana Patole
Nana PatoleEsakal
Updated on

Nana Patole Car Accident:

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा काल भीषण अपघात झाला होता. प्रचार करून परतत असताना ट्रकने त्यांच्या गाडीला मागून धडक दिली होती. या अपघातातून नाना पटोले हे थोडक्यात बचावले आहेत.

दरम्यान हा अपघात होता की घातपात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या अपघातामागचे कारण खरे कारण शोधण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. "हा अपघात नैसर्गिक कारणांमुळे झाला होता की हे जाणूनबुजून रचले गेले होते हे तपासण्यासाठी पक्षाने चौकशीची मागणी केली आहे."

महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी नाना पटोले यांच्या अपघाताप्रकरणी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिले आहे. यामध्ये अतुल लोंढे यांनी म्हटले की, " नाना पटोले यांच्या वाहनाला नुकत्याच झालेल्या अपघाताबाबत अत्यंत चिंतेची बाब तुमच्या निदर्शनास आणून देण्यासाठी मी लिहित आहे."

लोंढे पत्रात पुढे म्हणाले की, "या अपघाताचा आणि निवडणुकांचा काही संबंध आहे का? विरोधी पक्षाच्या नेत्यांना प्रभावित करण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडला आहे का? याचा तपास करणे आवश्यक आहे."

Nana Patole
Sudhir Mungantiwar: मुनगंटीवारांच्या अडचणी वाढणार? प्रचारसभेत काँग्रेसबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची निवडणूक आयोगाने घेतली दखल

"हा अपघात नैसर्गिक कारणांमुळे झाला आहे की हे जाणूनबुजून घडवला आहे, हे तपासण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मी तुम्हाला विनंती करतो. याव्यतिरिक्त, मी विनंती करतो की, तुम्ही पोलीस विभागाला नाना पटोले यांच्यासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे इतर महत्त्वाचे नेते बाळासाहेब थोरात, विजय वेडट्टीवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांची सुरक्षा वाढवण्याचे निर्देश द्यावेत," असे लोंढे यांनी आपल्या पत्राच्या शेवटी म्हटले आहे.

Nana Patole
Mumbai Crime: ब्युटिशिअनसोबत धक्कादायक प्रकार, Loan App ने शेअर केले महिलेचे आक्षेपार्ह फोटो

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्याचा निश्चय केला आहे. कारण 25 वर्षात प्रथमच काँग्रेस पक्षाने येथे आपला उमेदवार दिला आहे.

काँग्रेस पक्षाच्या पुरोगामी अजेंड्याचे प्रतिनिधित्व करणारे डॉ. प्रशांत पडोळे मतदारसंघातील प्रत्येक गावात मतदारांशी संपर्क साधण्यासाठी व्यापक प्रयत्न करत आहेत. येत्या निवडणुकीत २५ वर्षांनंतर काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल, असा विश्वास डॉ. प्रशांत पडोळे यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.