Ajit Pawar News : आमच्या सरकारमध्ये फार तोरा दाखवणाऱ्यांचा आता आवाजच बंद; पटोलेंचा अजित पवारांना टोला

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आपल्यासोबत सत्तेत सहभागी असले तरी महाराष्ट्रात भाजपच बॉस आहे, असे फडणवीस म्हणाले आहेत
Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar
Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit PawarSakal
Updated on

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक वक्तव्य सध्या चांगलच चर्चेत आहे. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आपल्यासोबत सत्तेत सहभागी असले तरी महाराष्ट्रात भाजपच बॉस आहे, असे फडणवीस म्हणाले. या वक्तव्यावरून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

फडणवीस काय म्हणाले...

राज्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राजकीय हालचालींना वेग आला आहे यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विस्तारकांना मार्गदर्शन करताना, राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आपल्यासोबत सत्तेत सहभागी असले तरी महाराष्ट्रात भाजपच बॉस आहे, असं वक्तव्य केलं होतं.

यावर नाना पटोले म्हणाले की, भाजप बॉस आहेच, मंत्रिमंडळाचे निर्णय फडणवीस हेच घेत आहेत. मुख्यमंत्री किंवा आमच्या सरकारमध्ये फार तोरा दाखवणारे आत्ताचे उपमुख्यमंत्री यांचा आता इकडे आवाजच बंद झाला. मग फडणवीस म्हणत आहेत त्यात असत्यता कुठं आहे? सत्यच आहे ते असेही नाना पटोले म्हणाले आहेत.

राज्य सरकारच्या धोरणांवर यावेळी टीका करताना पटोले म्हणाले की, राज्यात दळभद्री सरकार आहे, वेगनाहिन सरकार आहे. या सरकारला कोण मेलं कोण वाचलं याच्याशी देणंघेणं नाही. कारण की हे सरकार गुजरातच्या दोन मानसांसाठी काम करतंय. सरकारला जनतेची काळजी नाही. महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती आहे. अजूनही सरकारने दुष्काळ जाहीर केला नाही. शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. तरुणांमध्ये बरोजगारी आहे, असेही नाना पटोले म्हणाले. सरकार लायक राहिलं नाही, ही जनतेची भावना झाली आहे असेही नाना पटोले म्हणाले.

Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar
IND vs PAK WC 2023 : भारत-पाक सामन्यात भेटणार दुरावलेली कुटुंबे! पहिल्यांदाच नातीचं तोंड पाहणार हसन अलीचे सासरे

जागावाटपावर काँग्रेसची भूमिका काय?

मुंबईतील चार जागांसह शिर्डीतील जागेवर उद्धव ठाकरे गटाकडून दावा सांगितला जात आहे. यावर काँग्रेसची भूमिका काय? याविषयी बोलताना पटोले म्हणाले की, मेरिटप्रणाणे जागांचा निर्णय केला जाईल, भाजपला कुठल्याही परिस्थितीत, केंद्रात बसलेल्या हुकूमशाहाला सत्तेतून काढून देशातील लोकशाही वाचवणे ही काँग्रेसची भूमिका आहे. मेरिटच्या आधारावर निर्णय घेतला जाऊन ज्या ठिकाणी ज्या पक्षाच्या उमेदवाराचं मीरिट असेल त्याला तिकीट देण्याची काँग्रेसची भूमिका असेल असे नाना पटोले म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.