पटोलेंना तातडीचे हायकमांडचे बोलावणे; विधानसभेचा अध्यक्ष ठरणार

हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून (ता. २२) सुरुवात होणार आहे
nana patole
nana patole nana patole
Updated on

नागपूर : काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांना हायकमांडचे तातडीने बोलावणे आल्याने ते मंगळवारी दुपारी दीड वाजताचे विमान पकडून दिल्लीला रवाना झाले. या भेटीत विधानसभेचा अध्यक्ष ठरवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, सुनील केदार (Sunil Kedar) आणि नितीन राऊतही (Nitin Raut) दिल्लीतच असल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून (ता. २२) सुरुवात होणार आहे. याच अधिवेशनात अध्यक्षांची (Speaker of the Legislative Assembly) निवड करण्याचे काँग्रेसने ठरवले आहे. आघाडीतील घटक राष्ट्रवादी आणि शिवसेनेने यास संमती दिली आहे. नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. अध्यक्ष कोणाला करायचे असा प्रश्न काँग्रेससमोर आहे. एखाद्या वरिष्ठ आणि अनुभवी नेत्याला हे पद देण्याचा विचार सुरू आहे. यासाठी मंत्रिपद कोणाला सोडायचे नसल्याने अडचण आहे.

nana patole
ओमिक्रॉनचे धोकादायक परिणाम; पुरुषांची चिंता वाढवेल

माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाची सध्या दिल्लीत चर्चा आहे. तसेच झाल्यास त्यांचे बांधकाम खाते नाना पटोले यांच्याकडे येण्याची शक्यता आहे. पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदासोबत मंत्रिपदाचीही मागणी केली होती. त्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांचा बळी दिला जाणार होता. मात्र, राऊत यांचीही दिल्लीत तगडी फिल्डिंग असल्याने ते शक्य होऊ शकले नाही. काँग्रेसला कुठल्याही परिस्थितीत हिवाळी अधिवेशनातच अध्यक्ष नेमायचा आहे. त्यासाठी पटोले (nana patole) राज्य सरकारचे चहापान सोडून दिल्लीला रवाना झाले आहे.

विशेष म्हणजे ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) हे जिल्ह्यातील दोन नेतेसुद्धा दिल्लीत आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत ज्या नाट्यमय घडामोडी घडल्या त्याचीही या बैठकीत चर्चा होईल असा अंदाज वर्तविला जात आहे. पटोले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक रवींद्र भोयर यांना उमेदवारी दिली होती. मतदानाच्या शेवटच्या दिवशी त्यांना बदलण्यात आले. त्यामुळे काँग्रेसची मोठी नाचक्की झाली आहे. यावरून केदार-राऊत आणि नाना पटोले (nana patole) यांच्यात बिनसले आहे. याचाही जाब या बैठकीत विचारला जाणार असल्याचे समजते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()