'कोश्यारीजी वापसा जा, महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रस्ताव आणणार'

'शिवरायांच्या उल्लेख एकेरी केल्याबद्दल राज्यपाल कोश्यारी यांनी माफी मागावी'
political
politicalesakal
Updated on
Summary

'शिवरायांच्या उल्लेख एकेरी केल्याबद्दल राज्यपाल कोश्यारी यांनी माफी मागावी'

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. येत्या ११ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. मात्र आज पहिल्याच दिवशी अधिवेशात काही महत्वाच्या मुद्द्यांवरून गदारोळ झाला. विरोधकांनी पायऱ्यांवर घोषणाबाजी केली असून अधिवेशनाच्या आदल्या दिवशी चहापानाच्या कार्यक्रमावरही बहिष्कार टाकला. दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाज महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. यावरून सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. कोश्यारी जी आपण वापस जा, असा एक प्रस्ताव राज्याच्या विधीमंडळात आणणार असल्याचं कॉंग्रेसचे नाना पटोले (Nana Patole) यांनी स्पष्ट केलं आहे.

political
राज्यपालांनी गुंडाळलं भाषण; अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी

यावेळी ते म्हणाले, शिवरायांच्या उल्लेख एकेरी केल्याबद्दल राज्यपाल कोश्यारी यांनी माफी मागावी. भाजपने भूमिका स्पष्ट करावी, राज्यपालांना परत पाठवण्याचा प्रस्ताव आणणार तशी कायदेशीर तपासणी सुरु आहे. शिवरायांबद्दल तसेच सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. त्यामुळे जनता भाजपला माफ करणार नाही, असेही ते म्हणाले आहेत. राज्यपाल यांनी केलंल वक्तव्य हे त्यांच्या पदाला शोभेस नाही त्यामुळे याबाबतीत भाजपानेही (BJP) त्यांची भूमिका स्पष्ट करावी असेही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या या भाषणावेळीच मोठा गोंधळ झालेला पहायला मिळाला. या गोंधळामुळे राज्यपालांनी आपलं भाषण अर्ध्यावरच थांबवलं आणि ते निघून गेले. त्यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याबरोबर सत्ताधाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या नावाची घोषणाबाजी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजनेही मग नवाब मलिक हाय हाय च्या घोषणा दिल्या.

political
सोनू सूदचे मदतीचे पाऊल! युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची केली सुटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()