मुंबई : मुंबई महापालिका आयुक्त अस्लम शेख (Aslam Shikh) आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gayakwad) यांच्या प्रकरणात पोलिसांनी जी भूमिका घेतली ती अयोग्य असल्याचे मत काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांनी तलवार दाखवली त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. मात्र, पोलिसांनी ज्याची दाखल घ्यायला हवी ती घेतली जात नसल्याची टीकादेखील पटोले यांनी केली आहे. राज्यात काँग्रेस पक्ष गृहविभागावरील नाराजी नाट्यावर बुधवारी (दि.7) होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत गृहखात्याबद्दल चर्चा होईल असे त्यांनी यावेळी सांगितले. राज्यात पोलीस मनमानी कारभार करत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील गृहविभागावर सेनेनंतर आता काँग्रेसनेही आपली नाराजी व्यक्त केली आहे. (Nana Patole On Maharashtra Home Ministry)
पटोले म्हणाले की, केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर राज्यपाल (Maharashtra Governor) काम करत असून, लोक हितासाठी केलेले कायदे राज्यपाल थांबवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. विद्यापीठाच्या कायद्यात बदल करण्यात आला आहे त्यावर स्वाक्षरी करण्यास विलंब करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. विधिमंडळात विध्येयक मंजूर केले जाते त्याला जर राज्यपाल अडवत असतील तर चुकीचे आहे. भाजप राज्यपालांच्या अडून काम करत आहेत.
समृद्धीच्या उद्घाटनावरून वातावर तापले
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) जाहीर केलेल्या समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा ठाकरे सरकारच्या काळात पूर्ण होतोय. मात्र, आता याच्या उद्धाटनावरून राज्यात राजकीय वातावरण तापले असून, कोणी कितीही प्रयत्न केला तरी समृद्धी मगामार्गाच्या नावावरुन माझे नाव कुणीही मिटवू शकत नाही असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे तर, दुसरीकडे समृद्धी महामार्गाचा काळा भाग आहे याची चौकशी सरकारने लावावी असे म्हणत सरकार येतात जातात. देशात काँग्रेसने (Congress) उभे केलेल्या गोष्टींचे श्रेय काही जण घेत असून फडणवीस बाळ हट्ट करत आहेत असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. महागाई बेरोजगारी मुद्दे बाजूला ठेवून धार्मिक तेढ निर्माण केला जात आहे. भाजप वैर निर्माण करूत मूळ मुद्यापासून जनतेला दूर करत आहे. त्यामुळे केंद्र सरकारला आव्हान आहे की, त्यांनी बेरोजगारी, महागाईवर चर्चा करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.