आपल्या महाराष्ट्र देशाला महामानवांच्या समृद्ध आणि पुरोगामी वारसा लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विचारवंतांच्या पुरोगामी विचारांमुळे महाराष्ट्राला 'पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र' म्हणून संबोधले जाते.
या महामानवांच्या समतावादी आणि समाजक्रांतीचे विचार कायमच नव्या पिढीला आदर्श देणारे आणि प्रेरणादायी वाटतात. अशा महामानवांच्या विचारांचा महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर प्रभाव आहे. या महामानवांचे आदर्श आपल्या डोळ्यांमोर ठेवून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी नाना पटोले यांनी राजकारणात प्रवेश केला. नाना पटोले स्वतः जनतेच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहतात व निडरपणे प्रत्येक समस्येला सामोरे जातात. अन्यायाविरोधात लोकांना न्याय मिळवून देण्यासाठीचा त्यांचा हा लढा आजही सुरूच आहे. महामानवांच्या शिकवणीनुसार, नाना पटोले कोणत्याच जाती, धर्मात, वर्गात भेदभाव करत नाहीत. सर्वांना एकसमान मानतात. सर्वांशी आपुलकीने, प्रेमाने व सलोख्याने वागतात.
"भांडवलशाही ही भेद निर्माण करणारी व्यवस्था आहे, यात गरीब जनतेची कायमच पिळवणूक होते, त्यांच्यावर अन्याय होतो" आणि नाना पटोले कायमच या व्यवस्थेविरोधात लढा देत जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यास सदैव तत्पर असतात. "सर्वांना धार्मिक बाबतीत सारखे हक्क मिळाल्याशिवाय कधीही देशोद्धार होणार नाही." शाहू महाराजांच्या या वाक्याला प्रेरित होऊन नाना पटोले देशोद्धारासाठी सज्ज झाले. त्यांनी अनेक जातीजमातींना शासनाच्या योजनेचा फायदा व्हावा, त्यांना योग्य शिक्षणसोयी उपलब्ध व्हाव्यात म्हणून अनेक विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग यांचा समावेश ओ. बी सी. प्रवर्गात करून घेण्यासाठी प्रयत्न केले व त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "या देशातील जातीव्यवस्था ही सर्व प्रकारच्या विषमतेचे मूळ आहे," आणि याच विषमतेचे समूळ नष्ट झाले पाहिजे, असे नानांचे मत आहे. विदर्भात बरीच वर्षे झाली, गोंडगोवारी समाज आपल्या हक्काची लढाई लढत होते, सरकारकडे खूप मागणी करूनसुद्धा या समाजातील लोकांना अनुसूचित जातीजमातींचे हक्क, अधिकार मिळालेच नव्हते. "समोर कितीही संकट दिसले तरी लढायचे, मरण आले तरी चालेल", या महाराजांच्या शिकवणीनुसार नाना पटोले सरकारच्या नाकर्तेपणाला वाचा फोडण्यासाठी गोंडगोवारी समाजातील लोकांसह सरकारविरोधी आंदोलनात सहभागी झाले आणि त्यांना न्याय मिळवून दिला. या आंदोलनात पोलिसांनी लाठीचार्ज केला, मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. या आंदोलनात एकूण ११४ लोक शहीद झाले. पुढे या समाजासाठी नाना पटोले यांनी दोन आश्रम शाळा बांधून दिल्या, त्यांना स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी हक्काच्या जमिनी मिळवून दिल्या. आता या समाजातील लोक शेती करून आपला उदरनिर्वाह करतात.
नाना पटोले यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. लहान असताना त्यांनी शेतात ऊस पिकवला होता. तो पिकवलेला ऊस फॅक्टरीने मंजूर केला नाही. त्यामुळे ऊस जाळण्यापलीकडे कोणताच उपाय नव्हता. त्यावेळेस त्यांनी आपल्या डोळ्यासमोर स्वतः पिकवलेला ऊस जळताना पहिला आणि त्यांना अश्रू अनावर झाले नाहीत. त्यावेळेस त्यांना वाटलं, शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळवून देणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे आणि पुढे शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व महामानवांच्या विचारधारेला केंद्रस्थानी ठेवून नाना पटोले राजकारणात आले आणि राजकारणात प्रवेश घेताच शेतकऱ्यांच्या समस्या सोडवायला सुरुवात केली.
आदिवासी आणि शेतकऱ्यांना हक्काच्या जमिनी मिळाव्यात म्हणून नाना पटोले यांनी रेल रोको आंदोलन केले. या आंदोलनात त्यांना सात दिवस नागपूर येथील कारागृहात ठेवण्यात आले. तिथेही ते शांत बसले नाहीत, त्यांनी तिथेच तुरूंगात उपोषण सुरू केले आणि त्यांनी शेतकरी आणि आदिवासी समाजाला त्यांच्या हक्काची शेतजमीन मिळवून दिली. आर्थिक मदत असो किंवा आरोग्य सेवा, नाना पटोले कायम समाजकार्यात तत्पर असतात. 'धर्म ही जगण्याची पद्धत आहे आणि माणुसकी हाच खरा धर्म आहे,' असा विचार कायम उराशी बाळगणाऱ्या नाना पटोले यांनी पहिल्यांदा आमदारपदी असताना 'पलास' गावात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले. हीच प्रथा पुढे पंधरा वर्ष सुरू ठेवली.
या सामूहिक विवाह सोहळ्यांचा मुख्य उद्देश जातीजातीतील भेद नष्ट करून जनसामान्यांना एकत्रित करण्याचा होता. 'राजकारण हे लोककल्याणासाठी असावं, स्वतःच्या स्वार्थासाठी नसावं. जनतेचा उद्धार झाला तर देशाचा उद्धार होईल,' असे नाना पटोले यांचे ठाम मत आहे. ते कायमच निःस्वार्थीपणे जनसेवा करत असतात.
''शिव, शाहू, फुले, आंबेडकर हा एक विचारप्रवाह आहे आणि याच विचारधारेवर काँगेस पक्ष उभारलेला आहे. महाराष्ट्र संतांचा, विचारवंतांचा, क्रांतिकारकांचा आहे, महाराष्ट्र कधीच अन्याय सहन करत नाही कायम लढा देतो आणि पुढेही देत राहील, मी आजवर अन्यायाविरूद्ध लढत आलो आहे आणि पुढेही लढत राहीन," असे नाना पटोले म्हणतात.
Facebook link Nana Patole
https://www.facebook.com/nanapatoleinc?mibextid=ZbWKwL
Instagram link Nana Patole
https://www.instagram.com/nanapatoleinc?igsh=MTJiYm56c21veTV5NA==
Twitter link Nana Patole
https://x.com/NANA_PATOLE?t=N2H_xQP8h6AMQVFp-bsD3Q&s=09
YouTube link Nana Patole
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.