Nana Patole : आरक्षणाचा पेच भाजपने निर्माण केला ; नाना पटोले,पंतप्रधान मोदी यांनी पुढाकार घ्यावा

‘‘राज्यातील आरक्षणाचा पेच हा भारतीय जनता पक्षाने निर्माण केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनीच २०१४ मध्ये मराठा, धनगर, आदिवासी समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते.
Nana Patole
Nana Patolesakal
Updated on

मुंबई : ‘‘राज्यातील आरक्षणाचा पेच हा भारतीय जनता पक्षाने निर्माण केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनीच २०१४ मध्ये मराठा, धनगर, आदिवासी समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरही फडणवीस यांनी राणाभीमदेवी थाटात गर्जना करत सत्तेत आलो तर २४ तासात आरक्षणांचा प्रश्न सोडवतो, अशी वल्गना केली होती. पण प्रश्न सोडवला नाही,’’ अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी येथे केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आता पुढाकार घेऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, असे आवाहन त्यांनी केले. ‘‘आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने राज्यातील जाती -जातीत भांडणे लावण्याचे पाप केले आहे. शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा संपवण्याचे काम केले आहे. सत्तेत बसलेल्या लोकांनी आरक्षणावर निर्णय घ्यायचा असताना ते विरोधी पक्षांनाच विचारत आहेत. काँग्रेस पक्षाची आरक्षणावर भूमिका स्पष्ट असून जातनिहाय जनगणना करणे आणि आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा हटवली पाहिजे, असे राहुल गांधी यांनी जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकारने त्यावर निर्णय घेणे अपेक्षित आहे,’’असे पटोले म्हणाले.

‘‘शेतकरी आणि पूरग्रस्त भागातील लोक सरकारी मदतीची अपेक्षा करत आहेत. पण महायुती सरकारचे त्यांच्याकडे लक्ष नाही. पूरस्थितीमुळे शेतकरी कर्ज भरणा करू शकत नाही. त्यामुळे सरकारने तातडीने कर्जवसुली थांबवावी, अशी मागणी पटोले यांनी केली. ‘मविआ’चे सरकार सत्तेत आल्यावर काँग्रेस कर्जमाफी करेल,’’ असे आश्‍वासन त्यांनी दिले.

काँग्रेसची भूमिका स्पष्ट

मराठा समाजातील प्रतिनिधींच्या भेटीबद्दल बोलताना पटोले म्हणाले की, काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनमध्ये मराठा समाजातील लोकांनी भेट घेतली असताना पक्षाची भूमिका मांडली आहे. पुन्हा कोणी भेटणार असतील तर त्यांचेही स्वागत आहे. त्यांच्याशी चर्चा करू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.